खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावरुन राज्यात सध्या जोरदार गोंधळ उडाला आहे. राजद्रोहाचा तसेच सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. राणा दाम्पत्य १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. अहमदनगरच्या खासदार नवनीत राणा आणि रवि राणा यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
रवी राणा आणि नवनीत राणा सध्या न्यायालयीन कोठडीत असूनही राणा दाम्पत्य सरकारवर गंभीर आरोप करत असलेले पहायला मिळत आहे.राणा दाम्पत्याला २९ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आज राणा दाम्पत्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती परंतु ती उद्यावर ढकलली आहे. त्यामुळे आजही राणा दाम्पत्यांना दिलासा मिळालेला नाही मुंबई सत्र न्यायालयाकडून शनिवारी सुनावली केली जाणार आहे.
न्यायालयाने आधीच स्पष्ट केलं होतं की, शुक्रवारी शक्य झालं तर सुनावणी घेण्यात येईल. मात्र, न्यायालयात आधीच इतर अनेक प्रकरणांची सुनावणी आहे. त्यामुळे आज सुनावणी रद्द करण्यात आली.नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर सत्र न्यायालयात शनिवारी दुपारी 3 वाजता जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. राणा दाम्पत्याने घरच्या जेवणाची मागणी केली असून राणा दाम्पत्याच्या या याचिकेवरही आज सुनावणी होण्याची शक्यता आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम