the point now: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी सोमवारी सांगितले की, महाराष्ट्रात सत्ता गमावल्यानंतर काही लोक चिंताग्रस्त झाले आहेत. धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर वापरणे आणि हनुमान चालिसाचा जप करण्यावरून राज्यात झालेल्या ताज्या वादाच्या पार्श्वभूमीवर पवारांचे हे वक्तव्य आले आहे. ते म्हणाले की राज्य सरकारने या विषयावर सर्वपक्षीय बैठक बोलावली ही चांगली गोष्ट आहे आणि जर या चर्चेतून काही चांगले निष्पन्न झाले तर त्यांना खूप आनंद होईल.
“सत्ता येते आणि जाते त्यासाठी काळजी करण्याची गरज नाही. काही लोक उगाच चिंताग्रस्त होत आहेत आणि मी त्यांना दोष देत नाही, कारण राज्य निवडणुकीपूर्वी पुन्हा सत्तेत येण्याचे दावे करण्यात आले होते, परंतु तसे झाले नाही आणि त्यामुळे ते चिंतेत आहेत,” असा टोला पवारांनी लगावला.
त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीबाबत बोलताना, ते म्हणाले की, अशा धमक्या काय नवीन नाहीत आणि त्यांचे कोणतेही परिणाम ही होणार नाहीत. राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी ही बर्याच वेळा दिली गेली आहे, पण त्याचा काही परिणाम होत नाही… ही काही नवीन गोष्ट नाही. असे म्हणाले. “मतदानाची परिस्थिती उद्भवली तर नुकत्याच झालेल्या कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या निकालाने काय निकाल लागेल हे दाखवून दिले आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम