भोंगाचे वातावरण राजकारणात चांगलेच गाजत असे तर दुसरीकडे राहणा दांपत्य मुख्यमंत्र्यांच्या घरावर हनुमान चालीसा पठण करणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राणा दाम्पत्यांवर केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणावी अन्यथा मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा म्हणणार असे आमदार रवी राणा यांनी आव्हान केले होते. दाम्पत्य मुंबईत दाखल झाले असून शिवसैनिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राणा दाम्पत्यावर टीकास्त्र सोडले.
आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांचा मातोश्रीवर जाण्याचा हा बालहट्ट आहे. राणा दाम्पत्याच्या वक्तव्यावर अमरावती मधील शिवसेना कार्यकर्ते रवी राणा यांच्या घरावर आंदोलन करत पोहोचले. मात्र पोलिसांनी आक्रमक कार्यकर्त्यांना आधीच रोखले त्यानंतर आता मातोश्रीवर येऊन राणा दाम्पत्य हनुमान चालीसा म्हणायचे आव्हान शिवसेनेला दिले आहे.
त्यामुळे राणा आधी तुम्ही पोहोचणार कसे तिकडे ते सांगावं, मातोश्रीवर पोहोचण्याची वाट लय अवघड असून, सोपी नाही. त्यांनी त्याच्या मतदार संघात रहावं ते ठीक आहे. मात्र भडकाऊ प्रतिक्रिया माध्यमांवर देऊन प्रसिद्धी मिळवण्याचे काम सुरू असल्याचेही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले . अशा अनेक टीका विरोधकांकडून नाना दाम्पत्यावर केल्या जात आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम