सध्या राज्यामध्ये मशिदींवरील लाऊडस्पीकरबाबत वाद उफाळला आहे. राणा दाम्पत्य मुंबई हनुमान चालीसेचे पठण करणार आहेत. राणा दाम्पत्य मुंबईत आल्याने शिवसैनिका त्यावर उतरले आहेत. यांना रोखण्यासाठी युवा सेनेचे नेते वरून सरदेसाई यांनी राणा दाम्पत्यांना टोला लगावलाय.
राणा दांपत्य मुंबईत दाखल असल्याची माहिती मिळताच शिववसैनिक, पोलिसांचा बंदोबस्त कडक करण्यात आला. तर आता युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी जोरदार हल्लाबोल करत म्हणाले, ”राणा दाम्पत्यांना आमचं सांगणं आहे, मातोश्रीवर या आणि महाप्रसाद घेऊन जा, नुसत्या तारखा देऊ नका एकदा येऊन जा,” अशा शब्दात युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी इशारा दिला आहे.
”हे सर्व भाजप करीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायची आणि केंद्राची सुरक्षा घ्यायची असा प्रयत्न काही जण करीत आहेत,” अपक्ष आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण करणार असे आव्हान केले आहे. शिवसैनिक मोठ्या संख्येने कलानगर येथील मुख्यमंत्री यहंकारे यांच्या मातोश्री या निवासस्थानी जमा झाले. राणा दाम्पत्याने शिवसेनेला डिवचू नये अन्यथा त्यांना जशास तसे उत्तर देऊ अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम