नवी दिल्ली: वर्ष 2024 मध्ये होणार्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने ( Congress Party ) आतापासूनच आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी काँग्रेसने राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर ( Prashant Kishor )यांची मदत घेतली. त्यांच्या सल्ल्यानुसार काँग्रेस आता 370 जागांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे म्हटले जात आहे.
प्रशांत किशोर यांनी दिलेल्या सूचनांवर काम करण्यासाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Congress Acting President Sonia Gandhi ) यांनी वरिष्ठ नेत्यांचे पॅनल तयार केले आहे. काँग्रेसच्या या पी.के. समितीमध्ये पी चिदंबरम, अंबिका सोनी, जयराम रमेश,दिग्विजय सिंह, मुकुल वासनिक, रणदीप सुरजेवाला, केसी वेणुगोपाल यांचा समावेश आहे. प्रशांत किशोर यांच्यासोबत मंगळवारी बैठक झाल्यानंतर आज (बुधवार) या नेत्यांची 10 जनपथावर मॅरेथॉन बैठक झाली. मिळालेल्या माहितीनुसार आठवडाभरात हे पॅनल आपला अहवाल सोनिया गांधी यांना पाठवणार आहे.
रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला उत्तर प्रदेश, बिहार आणि ओडिशामध्ये एकट्याने निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला तर तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात आघाडी करून लढण्याची सूचना केली असल्याचे म्हटले जात आहे. प्रशांत किशोर यांच्या सूचनेला राहुल गांधी यांनी संमती दिल्याचे सांगण्यात येत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम