द पॉईंट नाऊ ब्युरो : शिवसेनेच्या एका माजी नगरसेविकेने विभाग प्रमुखाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. भारती कोळी यांनी शिवसेनेच्याच विभाग प्रमुखाला मारहाण केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, नवी मुंबई येथील माजी नगरसेविका भारती कोळी यांचा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार स्वीकारतांनाचा व्हिडीओ आणि फोटो बेलापूर विभाग प्रमुख प्रकाश आमटे यांनी वरिष्ठांना पाठवले. या गोष्टीचा राग आल्याने, भारती कोळी आणि त्यांच्या समर्थकांनी प्रकाश आमटे यांना मारहाण केली.
एका लोकार्पण सोहळ्याला भाजपच्या व्यासपीठावर भारती कोळी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी फडणवीस यांनी कोळी यांचा सत्कार करतांनाच व्हिडीओ आणि फोटो आमटे यांनी वरिष्ठांना पाठवले, म्हणून त्यांना मारहाण करण्यात आली. दरम्यान, याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम