द पॉईंट नाऊ ब्युरो : देशात सध्या इंधन दरवाढीने सामान्यांचे पुरते कंबरडे मोडले आहे. यावर बोलतांना समाजवादी पार्टी नेते अखिलेश यादव यांनी म्हटले की, अशीच दिवसाला 80 पैशांनी वाढ होत राहिली, तर एक दिवस पेट्रोल 275 रुपये होईल.
जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर दिवसागणिक वाढत आहेत. रशिया-युक्रेन युद्धाच्या परिणामामुळे सामान्यांना याची मोठ्या प्रमाणावर झळ बसत आहे.
देशात वाढत्या इंधन दरवाढीमुळे विरोधी पक्षांद्वारे सत्ताधारी भाजपावर एकामागे एक टीकास्त्र सोडले जात आहे. याच पार्श्वभूमीवर बोलतांना, अखिलेश यादव यांनी हा एक प्रकारचा हिशोबच मांडत पेट्रोल 275 रुपयांवर जाईल, असे म्हटले.
भारतात पेट्रोल 117 रुपयांवर आणि डिझेल देखील शंभरी पार करून गेले आहे. यामुळे सामान्य नागरिक इंधन दरांच्या कमी होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र रशिया-युक्रेन मध्ये सुरू असलेले युद्ध पाहता, याची शक्यता सध्या तरी कमीच दिसून येत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम