सेक्युलर विचारधारा? – ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी

0
113

द पॉईंट नाऊ ब्युरो : ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट सध्या खूप गाजतो आहे. प्रेक्षकवर्ग या चित्रपटाचे भरभरून कौतुक करत आहे. मात्र आता या चित्रपटवरून देखील राजकारण सुरू झाले आहे. आधी शिवसेना नेते संजय राऊत आणि आता काही सेक्युलर नेत्यांकडून या चित्रपटावरच बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या द काश्मीर फाईल्स या चित्रपटाने सर्वांचीच मने जिंकली आहेत. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायावर हा चित्रपट काढण्यात आलेला आहे. मात्र आता या चित्रपटावरून राजकारण तापू लागले आहे.

आसाममधील युडीएफ पक्षाचे प्रमुख खासदार मौलाना बदरुद्दीन अजमल आणि बसपा खासदार दानिश अली यांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. याआधी हा चित्रपट अर्धवट आहे. या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत आणि बऱ्याच नेत्यांनी देखील केली होती.

दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना Y दर्जाची सुरक्षा देखील देण्यात आली आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने देशभरात वाहवाही मिळवली आहे. अक्षरशः प्रेक्षकांचे डोळे पानावल्याचे देखील दिसून आले. मात्र या चित्रपटावर होणारी टीका बघता, अनेक प्रेक्षक यावर नाराजी व्यक्त करत आहेत. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जात असल्याने प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here