शिवसेना नेते संजय राऊत आज बॉम्ब टाकणार

0
37

द पॉईंट नाऊ ब्युरो :  भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष त्यांच्यात काडीमोड झाल्यापासून वाढू लागला आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यात त्यांनी भाजपला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी संजय राऊत यांनी ट्विट करून आपण शिवसेना भवणावर पत्रकार परिषद घेणार असून, यावेळी शिवसेना नाही, तर महाराष्ट्र बोलणार आहे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे राऊत हे आज मंगळवारच्या पत्रकार परिषदेत काय खुलासा करतात? ते काही गौप्यस्फोट करणार आहेत का? कोणाचे बिंग फुटणार याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान मागील काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात चांगलीच शाब्दिक खडाजंगी रंगलेली आहे. ज्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

संजय राऊत यांच्या या अचानक पत्रकार परिषद घेण्यामागे कारण काय? यात कोणत्या मुद्दयावर ते बोलणार? कोणाचे बिंग फुटणार आहे का? याकडे लक्ष लागले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here