‘हिजाब परिधान करायचा की बिकीनी हे ठरवण्याचा महिलांना पूर्ण अधिकार’

0
43

द पॉईंट नाऊ ब्युरो : कर्नाटक मधील हिजाब वादावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनीही वक्तव्य केले आहे. हिजाब घालायचा की बिकिनी हे ठरवण्याचा मुलींना अधिकार आहे. याबाबत प्रियंका गांधींनी ट्विटरवर ट्विट केले आहे.

कर्नाटक मध्ये सध्या हिजाब – भगवा वाद सुरु आहे. या कारणास्तव इथे तीन दिवस शाळा – महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. त्यात या वादास आता राजकीय रंग चढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

या पेटलेल्या वादाला धार्मिक रंग चढवला जात असल्याने इथले वातावरण चिघळले आहे. विद्यार्थ्यांनी दगडफेक केल्याने, इथे तीन दिवस शाळा – महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.

या वादात आता प्रियंका गांधींनी देखील उडी घेतल्याने, यावर आता अजून पुढे काय होते. यावर चिंता व्यक्त होत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here