द पॉईंट नाऊ ब्युरो : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांच्या सहकारी वर्गाने अर्थात मित्रांनी 100 कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मागील बऱ्याच काळापासून महाविकास आघाडी सरकार मधील बड्या नेत्यांना चांगलेच धारेवर धरलेले आहे. अनिल देशमुख, अनिल परब अशा मोठ्या नेत्यांवर त्यांनी घोटाळा केल्याचे आरोप केले. आता सोमय्या यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर देखील या बड्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. राऊत यांच्याशी संबंधित असलेले सुजित पाटकर यांची बनावट कागदी कंपनी असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
दरम्यान याबाबत लवकरच पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. आता या प्रकरणात नेमके पुढे काय होते हे दिसेलच.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम