एटापल्ली नगरपंचायतीत दोन अपक्षांचा शिवसेनेत प्रवेश

0
43

गडचिरोली : जिल्ह्यातील एटापल्ली नगरपंचायतीत सत्तेचे समीकरणात बदल होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार महाविकास आघाडीची सत्ता नगरपंचायतमध्ये स्थापन होऊ शकते. नगरपंचायत निवडणुकीत निवडून आलेले दोन अपेक्ष उमेदवार शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. या नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशामुळे महाविकास आघाडीतील तीनही पक्ष अजून मजबूत होणार आहेत.

नागेंद्र राजगोपाल सुलावार व सुनील कुडमेथे या दोन अपक्ष नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. एटापल्ली नगरपंचायतीच्या निवडणूकीत काँग्रेसचे पाच, राष्ट्रवादीचे तीन, तर शिवसेनेचे दोन नगरसेवक निवडून आलेत. या दोन अपक्षांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे महाविकास आघाडीकडे एकूण दहा नगरसेवक झाले आहेत . एटापल्ली नगरपंचायतीत भाजप तीन, काँग्रेस-राष्ट्रवादी तीन, काँग्रेस पाच, आदिवासी विद्यार्थी संघटना दोन, अपक्ष चार उमेदवार विजयी झाले यापैकी विजयी झालेल्या उमेदवारातून दोन अपक्ष उमेदवारांनी काल रात्री शिवसेनेत प्रवेश केला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here