द पॉईंट नाऊ ब्युरो : राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसची चांगलीच परतफेड केलेली आहे. राष्ट्रवादीने मालेगाव मधील काँग्रेसचे 27 नगरसेवक फोडून आपल्याकडे वळवून घेतले आहेत.
काँग्रेसने नुकतेच राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी बीडमध्ये भाजपला पाठिंबा देत सत्ता स्थापन केली. त्याची अव्वास सव्वा अशा प्रकारे राष्ट्रवादीने काँग्रेसला परतफेड करत मोठा दणका दिला आहे.
मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरांसह तब्बल 27 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसने फोडले. यामुळे काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.
राज्यात सोबत सत्तेत असून देखील राष्ट्रवादी अन काँग्रेसमध्ये काहीही आलबेल नाही. हे स्पष्ट दिसून येत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम