काँग्रेस – राष्ट्रवादीत नाही काही आलबेल, भाजपला पाठिंबा देऊन काँग्रेसने बदलला खेळ

0
39

द पॉईंट नाऊ ब्युरो : राजकीय गोटात कोठेही काहीही होऊ शकते हेच खरे. राजकीय जगतात काँग्रेस आणि भाजप हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. मात्र एका ठिकाणी काँग्रेसने चक्क भाजपला पाठिंबा दिला आहे.

बीड जिल्ह्याच्या केज नगरपंचायत मध्ये काँग्रेस पक्षाने आपल्या राजकीय सवंगडी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप पुरस्कृत जनविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. दोन्ही पक्ष मिळून लवकरच सत्ता स्थापन करणार असल्याचे बोलले जात आहे.

राज्यात सध्या काँग्रेस – राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. मात्र या आघाडीत नेहमीच काही ना काही वाद समोर येत असतात. त्यात कोणत्या ना कोणत्या पक्ष्याची नाराजी समोर येतेच. आता बीड मध्ये काँग्रेसने भाजपला देऊ केलेल्या पाठिंब्यातून देखील हेच दिसून येत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here