भाजपच्या मदतीने आमदार झालो; शिवसेना आमदाराचे वक्तव्य

0
48

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : एका शिवसेना आमदाराने म्हटले की, भाजपमुळे मी आमदार झालो. सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला येथील शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांनी एका ठिकाणी बोलतांना असं वक्तव्य केलं आहे. यामुळे शिवसेनेला पुन्हा घरचाच आहेर मिळाला आहे.

महाविकास आघाडीची स्थापना झाली ती, कधीकाळी एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या शिवसेना, काँग्रेस अन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन. तिघांनी मिळून आपला नवीन संसार थाटला. मात्र आपल्या जुन्या सवंगड्याची आठवण आल्याशिवाय राहतेय होय.

तालुक्यामध्ये शिवसेनेची मतं होती ती केवळ 1100. मात्र भाजपची साथ होती म्हणून आमदार झालो. भाजपची खूप मदत झाली. असं शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले.

सर्वात आधी 2014 च्या निवडणुकीत भाजपच्या मोदी लाटेत मोठ्या प्रमाणावर भाजपसह शिवसेनेच्या उमेदवारांना देखील फायदा झाला. आणि भरघोस मतांनी निवडून आले. 2019 च्या निवडणुकीत मात्र भाजप – शिवसेनेत बिनसले आणि दोघांनी काडीमोड घेतला. शिवसेनेने आपला वेगळा संसार राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत थाटला. मात्र या महाविकास आघाडीची स्थापना झाल्यापासून तीनही पक्षांमधील नेत्यांची नाराजी बऱ्याच वेळा दिसून आली.

नुकतेच एका शिवसेना नेत्याने, भाजपचे नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांनी भाजप – शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतात असे म्हटले. आणि आता शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलेलं हे वक्तव्य शिवसेनेला खूपच बोचण्यासारखं आहे.

आता आमदार पाटील यांच्या या वक्तव्या नंतर शिवसेनेची बडी नेते मंडळी काय बोलणार? याकडे लक्ष लागले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here