सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | मेशी परिसरात लागवड केलेल्या उन्हाळी कांद्यावर तणनाशकाची फवारणीमुळे मोठ्या प्रमाणावर कांदा पिकाचे नुकसान झाले असून सदर नुकसानीची रविवारी दि.२६ रोजी रात्री ८ वाजता कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतात बॅटरीच्या उजेडात पाहणी केली. त्यांच्या समवेत आ. डॉ. राहुल आहेर उपस्थित होते. यावेळी ना. कोकाटे यांनी संबंधित कंपनीचे अधिकारी व कृषी अधिकाऱ्यांशी फोनवर सूचना दिल्या. मेशी येथे शेतकऱ्यांनी इंडियन पेस्टींसाईड लिमिटेड कंपनीचे क्लोगोल्ड नावाचे तणनाशक कांदा पिकावर फवारल्याने जवळपास शंभर एकर पेक्षा जास्त क्षेत्रावरील कांदा पीक नष्ट झाले असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
Deola | दोषी औषध कंपनीवर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार – कृषीमंत्री कोकाटे
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मांडली व्यथा
रविवारी रात्री उशीरा येथे महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, आमदार डॉ. राहुल आहेर यांनी नुकसानग्रस्त कांदा पिकाची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी यावेळी आपली व्यथा मंत्री महोदयांसमोर मांडल्याने सदर नुकसानीची जबाबदारी निश्चित करून संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्याना नुकसान भरपाई देण्याबाबत सक्त सूचना दिल्या. यावेळी कळवण उपविभागीय कृषी अधिकारी अशोक डमाले यांना संबंधित कंपनीचे उप्तादित औषधांचे परीक्षण करण्याच्या व बाधित शेतकऱ्यांच्या पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी कृषीमंत्री ना. कोकाटे यांनी नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले. तसेच संबंधित कंपन्यांचे औषध साठा थांबविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी प्रशांत देवरे, सुनिल आहेर यांच्यासह स्थानिक शेतकरी प्रविण शिरसाठ, बापु आहेर, कैलास खैरनार, शशिकांत शिरसाठ, सारिका पाटील, भगवान शिरसाठ, शरद शिरसाठ, निवृत्ती चव्हाण, दत्तु शिरसाठ, विलास बोरसे, माणिक बोरसे, संदिप शिरसाठ आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम