सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | येथील राजधीर फाउंडेशन यांच्या वतीने भावडे, कापशी, हिंदोळा वस्ती व भौरी येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शनिवार (दि.२५) रोजी शालेय स्कूल बॅग व वॉटर बॉटलचे मोफत वाटप करण्यात आले. देवळा शहर व तालुक्यातील होतकरू तरुणांनी ऐतिहासिक असलेल्या राजधीर किल्लाच्या नावाने राजधीर फाउंडेशनची स्थापना केली असून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वदिनी या डोंगररांगांच्या पायथ्याशी वसलेल्या प्राथमिक शाळेतील गरजू 100 विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व वॉटर बॉटलचे वाटप केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खजिनदार डॉ.संजय निकम यांनी केले. गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव यांनी व येथील स्थानिक ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत केले. लवकरच जिल्ह्यातील गरीब, होतकरू विद्यार्थी यांच्यासाठी मदत देण्याचे नियोजन केले जाणार असल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक देवरे व संचालक डॉ. प्रमोद आहेर यांनी सांगितले.
Deola | देवळा शहरात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने भव्य हळदीकुंकू सोहळा
या कार्यक्रमाच्या संयोजनासाठी अध्यक्ष दीपक (बापू) देवरे, डॉ प्रमोद आहेर, प्रकाश भामरे, डॉ सुभाष आहेर, प्रशांत निकम, संजय आहेर, बापू चव्हाण, सुरेश बोरस्ते, भाऊसाहेब आहेर, भिला आहेर आणि राजधीरचे सर्व सभासद मित्रानी संयोजन केले. यावेळी सचिव प्रशांत निकम, प्रकाश भामरे, कार्यकारिणी सदस्य डॉ प्रमोद आहेर, डॉ सुभाष आहेर, किरण आहेर, संजय आहेर, डॉ संदीप पाटिल, हेमराज सोनवणे, दीपक अलई, भाऊसाहेब आहेर, सुरेश बोरस्ते, संदीप बुरड, नाशिक जिल्हा प्राथमिक शिक्षक नेते शेखर वाघ, विश्वास आहिरे आदी उपस्थित होते. पोपट विश्वास यांनी आभार मानले. तसेच येणाऱ्या पुढील आठवड्यात अजून 100 स्कूल बॅग्स आणि वॉटर बॉटल वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम