सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | कर्मवीर रामरावजी आहेर यांच्या स्मृतीदिनानिमित्त देवळा महाविद्यालयात आयोजित कर्मवीर केसरी महिला कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेसाठी देवळा, पुणे, नाशिक, भऊर, कोटबेल, मेशी, मालेगाव, खामखेडा, लोहणेर, वाजगाव, सटाणा, इगतपुरी, वाखारी, कानडगाव, पिंपळगाव, भगूर इत्यादी ठिकाणाहून 110 महिला कुस्तीगरांनी हजेरी लावली. भगूर, इगतपुरी, मालेगाव व पुणे येथील महिला कुस्तीगिरांनी प्रेक्षणीय कुस्त्या केल्या. कर्मवीर केसरी ही मानाची कुस्ती देवळा येथील कु. साक्षी आहेर विरुद्ध पुण्याची कु. ऋतुजा गाढवे यांच्यात होऊन ऋतुजा गाढवे हिने कुस्ती जिंकत कर्मवीर केसरीचा मान पटकाविला.
Deola | विखाऱ्या डोंगरावरील निसर्गरम्य ठिकाणी पार पडले एसकेडी स्कुलचे शिबिर
तिला स्व.गंगाधर मामा शिरसाठ यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ मान्यवरांच्या हस्ते 5100/- रुपयांचे बक्षीस देण्यात आले. अटीतटीच्या लढतीत साक्षी आहेर हिला हार पत्करावी लागली. कुस्त्या प्रेक्षणीय झाल्या. स्पर्धा उद्घाटन समारंभा प्रसंगी संस्थेचे चेअरमन तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर उपस्थित होते. तर संस्थेच्या सचिव डॉ. मालती आहेर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेसाठी प्रा. प्रमोद ठाकरे, प्रा. किरण भामरे, प्रा. डॉ. मनीष देवरे, डॉ. नरेंद्र निकम, प्रा. राजेंद्र कदम, अश्विनी कदम यांनी काम पाहिले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम