सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | खालप येथे संघर्ष समाज विकास मंडळ या संस्थेच्या माध्यमातून ग्रामपंचायत सदस्य आणि अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणाचे उद्घाटन उपसरपंच मुरलीधर अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रशिक्षणात गावातील असलेल्या सर्व शासकीय यंत्रणा त्यांची जबाबदारी, ग्रामपंचायत अधिनियम, पंधरावा वित्त आयोग आदी विविध शासकीय योजना बाबत प्रशिक्षक प्रशांत पवार यांनी सविस्तर माहिती दिली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाजीराव सूर्यवंशी, सुनील सूर्यवंशी, बेबीबाई सूर्यवंशी, विजया देवरे, कांताबाई पिंपळे, संतोष डांबरे, ग्रामविकास अधिकारी जितेंद्र झाल्टे आदींसह मुख्याध्यापक, शासकीय अधिकारी, कर्मचारी, बचत गटाच्या सीआरपी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार संघर्ष समाज विकास मंडळाचे अध्यक्ष विष्णू शेवाळे यांनी मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम