सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा देवळा तालुका अध्यक्ष पदी वाखारी येथील जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी मधुकर पंढरीनाथ जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. नांदगाव येथे शनिवारी (दि.27) रोजी संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त तैलिक समाज बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. यात देवळा तालुका अध्यक्ष पदी वाखारी येथील व जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी मधुकर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली.
Deola | देवळा महाविद्यालय आयोजित ‘कर्मवीर केसरी’ची मानकरी ठरली ऋतुजा गाढवे
या कार्यक्रमाला नांदगावचे आमदार सुहास कांदे हेदेखील उपस्थित होते. समाज बांधवांकडून आमदार कांदे यांचा व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्याचा सत्कार करण्यात आला. नवनियुक्त देवळा तालुका अध्यक्ष जाधव यांचे मा. खा. रामदास तडस, डॉ. भूषण कर्डीले, जिल्हाध्यक्ष समाधान चौधरी, कार्याध्यक्ष अशोक व्यवहारे, ऍड. शशिकांत व्यवहारे, दिलीप सौदाणे आदींसह, संभाजी शेजवळ, पोपट जाधव, भिकाजी सोनवणे, प्रकाश जाधव, वसंतराव जाधव, भाऊसाहेब जाधव, आकाश जाधव, ऍड बोरसे यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी देवळा, खर्डे, वाखारी येथील समाज बांधव उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम