Nashik Political | नांदगाव विधानसभा मतदारसंघात सकाळपासून राजकीय घडामोडींना वेग आला असून वादविवाद होताना दिसून येत आहेत. विविध ठिकाणांवरुन नागरिकांनी तक्रार केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली असून थेट प्रतिस्पर्धी उमेदवार आमने-सामने आल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, साकोरा नांदगाव येथे आज दुपारी अपक्ष उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ यांचे समर्थक मतदारांच्या भेटीसाठी आले असता, यावेळी ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी गाडी अडवत भुजबळ समर्थकांना घेरले. त्यामुळे आता एकच खळबळ उडाली.
Nashik Political | ‘फरांदे-गीते’ पुन्हा आमने-सामने; पोलीसांच्या मध्यस्थीने परीस्थिती नियंत्रणात
पोलिसांकडून गाडीची तपासणी
मराठा महासंघाचे उमेदवार डॉ. रोहन बोरसे यांच्या साकोरा गावात अपक्ष उमेदवार भुजबळ यांचे समर्थक संशयास्पदरित्या वावरत असल्याची माहिती मिळाल्यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येत संबंधिताकडे विचारणा केली असता वादाला सुरुवात झाली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले व त्यांनी गाडीला घेराव घातला. यावेळी ग्रामस्थ गाडीत बसलेल्या कार्यकर्त्यांना बाहेर येण्यासाठी आरडाओरड करीत होते. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत गाडीची तपासणी केली.
या तपासणीत संबंधित कार्यकर्त्यांकडे विचारणा करण्यात आली परंतु त्यात काय संशयास्पद आढळले याची माहिती समजू शकली नसून यामुळे साकोरा गावात अपक्ष उमेदवार भुजबळ आणि मराठा महासंघाचे उमेदवार बोरसे यांच्या समर्थकांमध्ये अर्धा तास वादविवाद सुरू होता. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चां रंगायला सुरुवात झाली आहे.
Political News | श्रीरामपूरातील शिंदे सेनेच्या उमेदवाराच्या गाडीवर गोळीबार; नगर जिल्ह्यात खळबळ
भुजबळ समर्थकांनी आरोप फेटाळले
दरम्यान, भुजबळ समर्थकांकडून ‘मतदारसंघात मतदान कसे सुरु आहे व यात काही अडचणी येत नाहीत ना? याची माहिती घेण्याकरिता आम्ही विविध केंद्रांना भेटी देत आहोत. त्यानुसार, साकोरा गावालाही भेट देण्यात आली. मात्र काही लोकांनी आमच्याशी अनावश्यक वाद घातला व आरोप केले. परंतु यात काही तथ्य नाही.’ असे सांगण्यात आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम