सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख ८ हजार ८०८ इतकी मतदारसंख्या असून, एकूण ३०६ मतदान केंद्रांवर मतदान होणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कैलास कडलग यांनी दिली.
Chandwad-Deola | अखेर राहुल दादांसाठी उदयदादा चांदवड-देवळ्याच्या मैदानात…
मतदानाचा फोटो काढणे, वा चित्रीकरण केल्यास फौजदारी कारवाई होणार
मतदारसंघाच्या देवळा तालुक्यात एकूण ११२ मतदानकेंद्रे असून ६१,६२२ पुरुष तर ५७,९९४ महिला असे एकूण १,१९,६१६ मतदार आहेत. यात दिव्यांग मतदारसंख्या ७३७ इतकी आहे. तर चांदवड तालुक्यात एकूण १९४ मतदानकेंद्रे असून त्यात ९८,८१० पुरुष आणि ९०,३८२ महिला असे एकूण १८,९१९२ मतदार आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी प्रत्येक मतदानकेंद्रावर 1 पोलीस कर्मचारी व 1 होमगार्ड देण्यात आला आहे. यात देवळा तालुक्यात ११२ मतदान केंद्राध्यक्ष असून मतदान अधिकारी ३३६, शिपाई कर्मचारी ११२, क्षेत्रीय अधिकारी ८ असे एकूण ५६८ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदान केंद्राच्या एका इमारतीत एकापेक्षा जास्त केंद्र असलेल्या ठिकाणी वेब कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण होणार असुन सुक्ष्म निरीक्षकही नेमण्यात आले आहेत. मतदान केंद्राच्या आत मोबाईल किंवा कॅमेरा घेऊन जाण्यास मनाई आहे. मतदाराने मतदानाचा फोटो काढणे, वा चित्रीकरण करणे अशा बाबी केल्यास त्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार असून मतदानादरम्यान कोणत्याही गैर प्रकाराविरूद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
Deola | प्रचार सभांनी देवळा शहर दुमदुमले; निवडणुकीच्या प्रचारात कार्यकर्त्यांची मात्र चंगळ
मतदान केंद्र क्र. ४८ हे आदर्श मतदान केंद्र
मतदारांच्या मदतीकरिता केंद्राबाहेर केंद्रस्तरीय अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, महसूल सेवक, स्वयंसेवक, स्थानिक महसूल व ग्रामप्रशासनाचे कर्मचारी देखील नियुक्त करण्यात आले आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तीन पोलीस निरीक्षक, तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक, पाच पोलीस उपनिरीक्षक आणि २०० पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येथील मतदान केंद्र क्र. ४८ हे आदर्श मतदान केंद्र असून ब्राईट बिगिनिंग इंग्लिश मीडियम स्कुल देवळा येथे ते असणार आहे. या आदर्श केंद्राची थीम घनकचरा व्यवस्थापन (कचरा वर्गीकरण) अशी असून प्रथम येणाऱ्या ३०० मतदारानं रोप वाटप नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम