Deola | प्रचार सभांनी देवळा शहर दुमदुमले; निवडणुकीच्या प्रचारात कार्यकर्त्यांची मात्र चंगळ

0
34
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचारास अवघे दोन दिवस बाकी असताना देवळा तालुक्यात सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराची राळ उठवली असून, दोन दिवसात राज्याच्या नेत्यांसह उमेदवारांनी प्रचार सभा घेत देवळा तालुक्यात निवडणुकीचे वातावरण तापवले.

Deola | ‘नार पार योजनेच्या माध्यमातून येत्या काळात प्रलंबित कोल्हे बारी प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा मानस’ – राहूल आहेर

प्रचार सभांमध्ये उमेदवारांकडून आरोपांची चिखल फेक

शनिवार, रविवार या दोन दिवसांत प्रहारचे माजी मंत्री बच्चू कडू यांनी गणेश निबाळकर यांच्यासाठी सभा घेतली. काँग्रेसचे उमेदवार शिरीष कोतवाल, अपक्ष उमेदवार केदा आहेर, भाजपचे उमेदवार आमदार डॉ. राहुल आहेर या सर्वच उमेदवारांनी देवळा शहरासह तालुक्यातील जि.प. गटात मतदारांच्या भेटीगाठी घेत आरोपांची चिखल फेक करत प्रचार सभा घेतल्या.

Deola | ‘राजकीय क्षेत्रात आरोप-प्रत्यारोप झाले तर आपण समजू शकतो’; लोहोणेर येथील सभेत राहूल आहेरांचे भावोद्गार

निवडणुकीच्या प्रचारात कार्यकर्त्यांची चंगळ

रविवारी दि. १७ रोजी मतदार संघातील चांदवड येथे भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार आमदार डॉ. राहुल आहेर यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. डॉ. आहेर यांनी आपल्याला उमेदवारी मिळून एक महिना झाल्यानंतर देवळा शहरात रविवारी दि. १७ रोजी सायंकाळी प्रथमच रॅलीद्वारे भव्य शक्तिप्रदर्शन करत मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या. सोमवारी दि. १८ रोजी प्रचाराची सांगता होणार असुन, गेल्या पंधरा दिवसांपासून देवळा तालुक्यातील उमेदवारांनी जेवणावळी वर भर देऊन कार्यकर्त्यांची चांगली चंगळ केल्याचे दिसून आले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here