CM Eknath Shinde | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे मालेगाव बाह्य मतदार संघातील उमेदवार दादा भुसे यांच्या प्रचारार्थ आज दिनांक 17 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडली यावेळी त्यांनी महायुतीच्या विकासकामांवर भाष्य केले.
23 तारखेला विजयाचा गुलाल उधळायचा आहे.
यावेळी बोलताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “दादा भूसेंना आशीर्वाद देण्याकरिता आलेला हा जनसमुदाय पाहता, मला मालेगावात पुन्हा धनुष्यबाणाचा विजय होईल. असा विश्वास जाणवत आहे. त्यामुळे 20 तारखेला धनुष्यबाणाचे बटन दाबत आपल्याला 23 तारखेला विजयाचा गुलाल उधळायचं आहे.” असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून यावेळी व्यक्त करण्यात आला.
CM Eknath Shinde | ‘होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी’; शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
नार पार कार्यान्वित करून मालेगावचा पाणीप्रश्न सोडवणार
यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी अद्वय हिरे यांच्या प्रचारार्थ मालेगावात घेतलेल्या सभेत दादा भुसेंवर तोफ डागली होती. यावरून मुख्यमंत्र्यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले. तसेच, “परभणीत एका मुलीने आत्महत्या केल्याची बातमी मी पाहिली. आपल्या राज्यात जर एका मुलीला शिक्षणासाठी पैसे नाहीत म्हणून आत्महत्या करावी लागत असेल. तर, या सत्तेचा उपयोग काय. म्हणून आम्ही मुलींसाठी मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. दादा भुसे यांनी मागणी केलीय की, मालेगाव जिल्हा झाला पाहिजे. तुम्ही दादांना डबल लीड देणार तर, मी जिल्हा देणार. नार पार कार्यान्वित करून मालेगावचा पाणीप्रश्न सोडवू, रोजगार निर्मितीला चालना देऊ, मेडिकल कॉलेज आणि इंजिनीयरिंग कॉलेज मालेगावला आणणार.” असे आश्वासन त्यांनी जनतेला दिले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम