Deola | ‘राजकीय क्षेत्रात आरोप-प्रत्यारोप झाले तर आपण समजू शकतो’; लोहोणेर येथील सभेत राहूल आहेरांचे भावोद्गार

0
46
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | महायुती शासनाचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेला ‘नार पार’ प्रकल्प अस्तिवात आल्या नंतर दुष्काळी तालुका म्हणून जन्माला आलेल्या देवळा तालुक्याची नव्याने खरी ओळख निर्माण होणार असून या प्रकल्पामुळे भविष्यात गिरणा नदी बारमाही वाहणार आहे. देवळा तालुका सुजलाम सुफलाम झालेला पाहणे हे आमचे दिव्य स्वप्न आहे आणि ते लवकरच प्रत्यक्षात उतरेल याची ग्वाही देतो. राजकीय क्षेत्रात आरोप-प्रत्यारोप झाले तर आपण समजू शकतो.” असे भावोद्गार आ. डॉ. राहुल आहेर यांनी विधानसभेच्या प्रचार्थ आयोजित करण्यात आलेल्या लोहोणेर येथील सभेत काढले.

Deola | ‘लाडकी बहीण योजनेमुळे ग्रामीण भागातील अर्थचक्र फिरायला मदत झाली’; राहूल आहेरांचे प्रतिपादन

शुक्रवार दिनांक १५ रोजी सायंकाळी चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार डॉ. राहुल आहेर यांचा देवळा तालुक्यातील लोहोणेर गटातील डोंगरगाव, निंबोळा, महालपाटणे, रण्यादेवपाडे, देवपूरपाडे, फुलेनगर, वासोळ, खालप, सावकी, खामखेडा, भऊर, विठेवाडी, झिरेपिंपळ, लोहोणेर गावातील दौऱ्याच्या सांगता प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख देवा वाघ, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अरुण आहेर, प्रशांत देवरे, मविप्रचे माजी संचालक प्रमोद पाटील, भाजपा प्रवक्ते प्रवीण अलई, दिगंबर कोठावदे, प्रवीण आहिरे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

Deola | ‘माझी आमदारकी जनतेसाठी पणाला लावायला मागेपुढे पहाणार नाही’- केदा आहेर

काय म्हणाले राहुल आहेर? 

“विधानसभेच्या प्रचारसाठी सकाळपासून या लोहोणेर जिल्हा परिषद गटाचा दौरा करीत असताना डोंगरगाव पासून सुरुवात करून प्रचाराच्या फेरी निमित्ताने आम्ही ज्या ज्या गावांमध्ये गेलो, एवढ्या मोठ्या संख्येने स्वागत केले. त्या फेरीचे रूपांतर सभांमध्ये होत चाललंय. जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घेतली आहे. आता नेत्यांच्या हातात ही निवडणूक राहिलेली नाही. आता जनता ठरवेल तुम्ही कामांसाठीच आशीर्वाद दिला होता आणि हे काम प्रामाणिकपणे आपल्या ज्या गावांनी जी जी मागणी केली ते काम करण्याचा प्रयत्न मी केला आहे आणि आता याच्यानंतर तुम्ही आणि मी डायरेक्ट कॉन्टॅक्ट राहणार आहे. मध्ये कुठलाच कपॅसिटर येणार नाही. मी कधीच खोटं बोलत नाही. पण ज्या अपेक्षांनी आज लोक माझ्यामागे उभे राहिलेले आहेत. या अपेक्षेने तुम्ही सर्वांनी ही निवडणूक हाती घेतलेली आहे. माझी जबाबदारी आता याच्यापेक्षा दहा पट वाढलेली आहे आणि हा जबाबदारीचा शिवधनुष्य पेलल्याशिवाय मी राहणार नाही.

राजकारणामध्ये दोन विचारसरणी असतात या दोन्ही विचारसरणी आज माझ्या प्रेमापोटी असतील किंवा मला आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्व एकत्र आलात हेच खऱ्या अर्थाने मी समजतो. माझ्या कामाची पावती हीच आहे. होणारी विधानसभेची ही निवडणूक पुढच्या पाच वर्षाचा विचार करण्याची आहे. तुम्ही सर्व सुज्ञ जनता आहात आणि म्हणून आता ही ऐतिहासिक निर्णय घेण्याची निवडनुक आहे. ज्या पद्धतीने आज तुम्ही सर्व एकत्र आलेले आहात. ही एकजूट 20 तारखेपर्यंत आपल्याला टिकवावी लागेल. ही एकजूट 20 तारखेला मतभेटीमध्ये बंद करावी लागेल आणि ही एकजूट 23 तारखेला मतपेटीमधून बाहेर पण यावी लागेल. तरच भविष्याची पाच वर्ष तुम्हाला एक चांगलं सरकार मिळणार आहे.” अशी ग्वाही आ. डॉ. राहुल आहेर यांनी दिली.

Deola | ‘माझी आमदारकी जनतेसाठी पणाला लावायला मागेपुढे पहाणार नाही’- केदा आहेर

सभेला बहुसंख्य महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित

भाजप माजी जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, बाळासाहेब बच्छाव, आण्णा पाटील शेवाळे, दिपक बच्छाव, मंगलचंद जैन, बाबुराव निकम, विलास निकम, अभिमन पवार, प्रशांत देवरे, शिवसेना तालुकाप्रमुख दीपक निकम, डॉ.रमणलाल सुराणा, अनिल आहिरे, शिवाजी महाजन, दगडू भामरे, माणिक निकम, महेंद्र हिरे, नानाजी सूर्यवंशी, महेंद्र आहेर, राजेंद्र निकम, अभिमन आहिरे, मुन्ना निकम, स्वप्निल पाटील, आप्पा जगताप, अर्जुनसिग परदेशी, बाजीराव शेवाळे, शशिकांत निकम, सागर खरोले, अरुण अहिरे, काशिनाथ पवार, कारभारी पवार, समाधान महाजन आदीसह बहुसंख्य महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित हो ते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here