सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गेल्या पाच महिन्यात एक लाखांहून अधिक महिलांसाठी महायुती सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत 75 कोटी रुपयांचा लाभ मिळाला असून, त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थचक्र मोठ्या प्रमाणात फिरायला मदत झाली असल्याचे प्रतिपादन महायुतीचे भाजपचे उमेदवार आमदार डॉ राहुल आहेर यांनी महाल पाटणे येथील प्रचार सभेत केले.
Deola | ‘माझी आमदारकी जनतेसाठी पणाला लावायला मागेपुढे पहाणार नाही’- केदा आहेर
महाल पाटणे येथील गिरणा नदीवरील प्रलंबित पुलाला प्रशासकीय मान्यता प्राप्त
महायुती प्रणित भाजपा, शिवसेना, राष्ठ्रवादी काँग्रेस, आरपीआय (आठवले गट) मित्र पक्षाचे देवळा चांदवड विधानसभा मतदार संघातील उमेदवार डॉ. राहुल आहेर यांनी शुक्रवारी दि. १५ रोजी देवळा तालुक्यातील लोहोणेर जि.प. गटातील महाल पाटणे येथील जाहीर सभेत बोलताना ते पुढे म्हणाले की, “गेल्या तीस वर्षांपासून महाल पाटणे येथील गिरणा नदीवरील प्रलंबित असलेल्या पुलाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून, लवकरच त्याचे काम सुरू होणार आहे. त्याच प्रमाणे केटी वेअर जवळील मॅक व्हील गेटचे काम त्वरित पूर्ण करण्यात येईल.” असे ठोस आश्वासन देत त्यांनी दहा वर्षांत महाल पाटणे गावात केलेल्या विविध विकास कामांची माहिती यावेळेला दिली.
Deola | कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात मतदान जनजागृती
सायंकाळी ७ वाजता लोहोणेर येथे जाहीर सभा
याप्रसंगी माजी सरपंच अरुण दादा आहेर, उपसरपंच तुषार कुलकर्णी, शिवसेना तालुका संघटक तसेच ग्रामपंचायत सदस्य योगेश अहिरे, ग्रामपंचायत सदस्य गणेश बच्छाव, निर्मला अहिरे, ग्रामपंचायत सदस्य काजल खरोले वसंत भाटेवाल, पंडित अहिरे, शिवसेना उपतालुकाप्रमुख सुनील अहिरे, नाना अहिरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार डॉ. आहेर यांनी यावेळी डोंगरगाव, निबोळा, रणदेवपाडा, देवपूर पाडा, फुलेनगर, वासोळ, खालप, सावकी, खामखेडा, भऊर, विठेवाडी, झिरेपिंपळ याठिकाणी प्रचार दौरा केला. सायंकाळी ७ वाजता लोहोणेर येथे जाहीर सभा झाली. यावेळी सभेला मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम