Dindori | दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे दुख:द निधन

0
75
#image_title

Dindori | दिंडोरीतील लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे आज सकाळी दुख:द निधन झाले आहे. चव्हाण गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. यातच त्यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. ते दोनवेळा दिंडोरी मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले होते.

Dindori | मतदान रुपी भाऊबीजेची भेट देऊन सुनिता ताईंना आमदार करा- प्रवीण नाना जाधव

मालेगाव व दिंडोरीत अनेक वर्षे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले

माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मालेगाव व त्यानंतर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती येथे देखील त्यांनी पदे भूषवली असून दिंडोरीत खासदार असताना भाजपचे सरकार वाचवण्यासाठी ते एअर ॲम्बुलन्सने दिल्लीला गेले होते. ते कायम भाजपशी एकनिष्ठ होते. मात्र 2019 च्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपकडून त्यांना तिकीट देण्यात आले नव्हते. तरी देखील त्यांनी भाजपची साथ सोडली नव्हती. त्यांच्या पश्चात पत्नी कलावती चव्हाण, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

Dindori | मराठी अध्यापक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी सुरेश सलादे यांची निवड

भाजपशी कायम एकनिष्ठ राहिले

2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत हरिश्चंद्र चव्हाण यांनी निवडणुकीवेळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून विजय प्राप्त केला होता. 2014 साली त्यांनी विद्यमान खासदार भारती पवार यांचा 2 लाख 47 हजार मतांनी पराभव केला होता. भारती पवार त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढल्या होत्या. पण 2019 मध्ये भारती पवारांनी भाजपत प्रवेश केला. त्यानंतर भाजपने हरिश्चंद्र पवार यांची उमेदवारी भारती पवार यांना दिली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारती पवार 1 लाख 98 हजार 79 मतांनी विजयी झाल्या होत्या.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here