द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : मागील बऱ्याच कालावधी पासून सुरू असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील 100 कोटींचे वसुली आरोप प्रकरणात आता नवीनच खुलासा झाला आहे.
अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी एक नवीनच खुलासा केल्याने, आता हे प्रकरण नव्या वळणावर पोहोचणार असे दिसत आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोणतीही 100 कोटींची वसुली करायला सांगितली नव्हती. तसेच मी कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत. असे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी चांदीवाल आयोगासमोर सांगितले आहे.
सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर मुंबई चे निलंबित पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिन्याला 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा लेटर बॉम्ब फोडला होता. ज्यामुळे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. आणि जे सध्या अटकेत आहेत. हे आरोप केल्या नंतर परमबीर सिंह गायब झाले होते.
आता सचिन वाझे यांनी तर अनिल देशमुखांनी असे कोणतेही वसुलीचे टार्गेट दिलेच नाही आणि मी कोणाकडून पैसे घेतले नाहीत. असे म्हणत अनिल देशमुखांना क्लीन चिटच दिली आहे.
परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची गंभीर दखल घेतली जाऊन, त्यासंबंधित तपासासाठी चांदीवाल आयोगाची नेमणूक करण्यात आली आहे. आणि ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. याच तपासा दरम्यान आता सचिन वाझे यांनी हा नवीन खुलासा चांदीवाल आयोगा समोर केल्याने, मोठा खुलासा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाल्यानंतर आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तर त्यांच्या घरी जाऊन झडती देखील घेण्यात आली. यात अनिल देशमुखांनी त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले होते. आणि आता सचिन वाझे यांच्या या नवीन खुलाषाने 100 कोटी वसुली प्रकरण वेगळ्याच वळणावर पोहोचले आहे.
परमबीर सिंह यांनी केलेले आरोप, सचिन वाझेंचा हा नवीन खुलासा यामुळे हे प्रकरण अनेक प्रश्न निर्माण करू लागले आहे. अचानक सचिन वाझेंच्या या चौकशीत हे कसे समोर आले? हा देखील प्रश्न निर्माण होत आहे.
आता यापुढे अजून नवीन काय खुलासे होतात? अजून काय धागे दोरे हाती लागतात? कोण खरे – कोण खोटे? हे चांदीवाल आयोगाच्या चौकशीतून अजून बाहेर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
[…] […]