Dada Bhuse | ‘बापाची औलाद असशील तर दाखव पेनड्राईव्ह’; भूसेंचे विरोधकांना खुले आव्हान

0
57
#image_title

Dada Bhuse | मालेगाव बाह्य मतदार संघातून विद्यमान आमदार, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांना एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि महायुतीतर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, येत्या 28 ऑक्टोबर रोजी ते पाचव्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज शहरातील बालाजी लॉन्स येथे मंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Dada Bhuse | ‘या वाचाळ वीरांनी स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केला’; भूसेंकडून हिरेंचा समाचार

हजारो शिवसैनिकांची बैठकीला उपस्थिती

शिवसेना पदाधिकारी आयोजित या नियोजन बैठकीसाठी हजारोंच्या संख्येने शिवसैनिक आणि महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी “जनतेच्या आशीर्वादातून २३ तारखेला मालेगावमध्ये पुन्हा एकदा भगवा अभिमानाने आणि डौलाने फडकेल, असा विश्वास दादा भुसे यांनी व्यक्त केला. पुढे बोलत ते म्हणाले की “आता निवडणुका आल्यावर काही लोक जागे झाले आहेत आणि बळजबरीने लोकांना भेटताहेत, रील्स बनवून जनतेला वेड्यात काढताय. कधीतरी केलेल्या मदतीचेही विरोधक बोलून दाखवत आहेत. केलेली मदत ही कधीही बोलून दाखवू नये, अशी आपली संस्कृती आहे. मात्र, हे सफरचंद दिले तरी बोलून दाखवताय. यांना देव सद्बुद्धी देवो” असा खोचक टोला यावेळी त्यांनी विरोधकांना नाव न घेता लगावला.

दादा भुसे यांचे विरोधकांना खुले आव्हान

तसेच, “ते कुणी तरी म्हटले की, माझ्याकडे पेनड्राईव्ह आहे. मी स्वतः त्याला सांगतो की बापाची औलाद असशील तर दाखव. माझा नाद करायचा नाही,” असे म्हणत यावेळी दादा भुसे यांनी विरोधकांना खुले आव्हान दिले. “काही लोकांनी मालेगावमधील काँक्रिट रस्त्याने तापमान वाढत असल्याचा हा जावई शोध लावला आहे. यांना फक्त राजकारण करायचे आहे. यांना जनतेशी काहीही देणेघेणे नाही” या शब्दांत त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. “हे बाजार समितीवर बोलत आहेत. मात्र ज्यांनी बाजार समिती सांभाळली. ते म्हणतात की मला काय दिले..?  माझी बदनामी केली जातेय. हे जनतेला माहिती आहे” असेही यावेळी भुसे म्हणाले.

मालेगाव आणखी पाणीदार होणार दादा भुसे यांचे आश्वासन

पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना मंत्री भुसेंनी, “या निवडणुकीला सामोरे जाताना मला अजेंडा विचारला जातो. तेव्हा मी सांगतो की मालेगावचे नाव राज्यात अभिमानाने उंचावण्यासाठी, सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी नागरिकांच्या सेवेत मी स्वतःला वाहून घेतले असून हाच माझा अजेंडा आहे. आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे रात्री शेवटच्या माणसाला भेटेपर्यंत झोपत नाहीत, 24 तास हे सरकार जनेतेच्या सेवेत असते.” असे म्हटले आहे. आतापर्यंत 3000 आदिवासी बांधवांना घरे मिळाली, अतिक्रमित घरे नियमित केलीत, शासकीय योजना गावोगावी राबविण्यात आल्या, पोखरा योजनेत सहभाग झाला, गिरणा आणि मोसम नदीवर बंधारे बांधून तालुका जलमय झाला, येणाऱ्या काळात नार पारच्या माध्यमातून मालेगाव आणखी पाणीदार होणार असल्याचेही मंत्री भुसे यांनी आश्वासित केले. मालेगावचे नाव खराब होणार नाही यासाठी काम केले असून आज राज्यभरात मालेगावचे नाव अभिमानाने घेतले जाते, असे गौरवोद्गारही केले.

Dada Bhuse | निवडणुकीच्या तोंडावर युतीत बिनसलं; व्हायरल व्हिडिओने पालकमंत्र्यांच्या चिंतेत वाढ

आपल्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेवूनच आपण प्रवेश देणार!

“आज याठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्याच्या नियोजनासाठी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थिती आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करायला किती लोक असतील. हा विचार विरोधकांनी करावाकरावा” असा इशारा यावेळी विरोधकांना दिला. पक्षप्रवेशासाठी रीघ लागली आहे. मात्र आपल्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेवूनच आपण प्रवेश देणार आहोत. येत्या 28 तारखेलाही अनेक जण प्रवेश करणार असल्याचे देखील यावेळी भुसे यांनी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी मोठ्या संख्येने 28 तारखेला अर्ज भरण्यासाठी येण्याचे आवाहनही जनतेला केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here