Pune News | बिग हिट मीडिया प्रस्तुत ‘पैलवान’ गाण्याचा संगीत अनावरण सोहळा जल्लोषात संपन्न

0
64
#image_title

Pune News | हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या प्राचीन कुस्ती या खेळाचा उल्लेख अगदी रामायण, महाभारतातही केला गेला आहे. कुस्ती हा शारीरिक ताकद, धैर्य, कौशल्य, बुद्धी आणि तांत्रिकतेचा एक उत्कृष्ट संगम असून भारतीय संस्कृती आणि इतिहासाचा एक अविभाज्य भाग असलेला खेळ राहिला आहे. या खेळाला भारतात सन्मानाचे स्थान आहे. कुस्तीच्या खेळातून भारतीय समाजात शिस्त, शौर्य आणि निष्ठा यांचे मूल्य रुजवले गेले आहे. ‘बीग हिट मिडिया’ प्रस्तुत ‘पैलवान’ गाणे प्रदर्शित असून हे गाणे पाहून भारतीय कुस्तीचा सुवर्णकाळ अजूनही सुरू आहे आणि येत्या पिढी यशाची नवे शिखरे गाठेल याची खात्री वाटते. हे गाणे रोमांचक, भावनिक, थरारक, प्रेरणादायी असून या गाण्यात अंकित मोहन सोबत भूषण शिवतारे, दिनानाथ सिंग, शंभू आणि आयुष काळे झळकल्या आहेत. हे गाणं सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी गायले असून ब्रह्मा यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. तर या गाण्याची गीत रचना ब्रम्हा आणि भूषण विश्वनाथ यांनी केले आहे. या गाण्याचे दिग्दर्शन मनीष महाजन यांनी केले आहे. या गाण्याची निर्मिती हृतिक अनिल मनी आणि अनुष्का अविनाश सोलवटे यांनी केली आहे. तर नुकताच या गाण्याचा संगीत अनावरण सोहळा पुण्यात थाटामाटात पार पडला आहे.

Nashik Politics | नाशिक मध्य मतदारसंघाचा तिढा सुटेना; देवयानी फरांदेंच्या अडचणींत वाढ!

संगीता अनावरण सोहळ्याला अनेक दिगजांची उपस्थिती

या गाण्याच्या संगीत अनावरण सोहळ्याला अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. या वेळी क्रीडा विश्वातील ज्ञानचंद पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू असलेले एम.ओ.वीचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. प्रदीप गंधे, ज्ञानचंद पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू/रेफरी आणि एम ओ वीचे – रोइंग कार्यकारी मंडळ सदस्य श्रीमती स्मिता शिरोळे, भारत तायक्वांदो अध्यक्ष श्री. नामदेव शिरगावकर, जॉइंट सेक्रेटरी-ऑल इंडिया तसेच वुशू कार्यकारी मंडळ सदस्य श्री सोपान कटके, महाराष्ट्र ज्युदो असोसिएशन खजिनदार ॲड.धनंजय भोसले, एम. ओ. वीचे कार्यकारी मंडळ सदस्य – रग्बी महाराष्ट्र क्रीडा फिजिओथेरपिस्ट डॉ.संदीप चौधरी व हिंदी मराठी चित्रपट सृष्टीमधील गेल्या दशकांपासून कार्यरत असलेले अनिल मनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खाजगी सचिव अविनाश सोलवट तसेच कलाकार विशाल फाळे, अनुश्री माने, विश्वास पाटील, दिग्दर्शक अभिजीत दानी यांनी देखील उपस्थित दर्शवली.

Nashik Political | नाशिक पश्चिममध्ये भाजपला फटका; बंडखोरी अटळ?

निर्मात्याने केले मनोगत व्यक्त

यावेळी निर्माता ऋतिक अनिल या गाण्याविषयी बोलताना “महाराष्ट्राचे सांस्कृतिक तसेच आपल्या मातीतील मराठमोळ्या लोकसंगीत जगभर पसरवण्यासाठी आम्ही विविध गाणी या रेकॉर्ड लेबल मार्फत प्रदर्शित करत आहोत. अभिनेता अंकित मोहन यांनी या गाण्यासाठी आपल्या फिटनेस वर संपूर्ण महिनाभर मेहनत घेत तसेच ‘पैलवान’ दिसण्यापेक्षा, पैलवान कशापद्धतीने विचार करत असतील, त्यांचा वागणं बोलणं या सर्वच गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला आहे. ‘पैलवान’ गाण्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. असेच प्रेम कायम मिळत राहो अशी सदिच्छा.” असे म्हणत आपले मनोगत व्यक्त केले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here