Deola | पिंपळगाव जनता विद्यालयात ‘जागतिक हात धुवा दिन’ साजरा

0
3
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | मविप्रच्या पिंपळगाव (वा) येथील जनता विद्यालयात ‘जागतिक हात धुवा दिन’ उपक्रम साजरा करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य संगीता आहेर, प्रभारी पर्यवेक्षक अशोक खैरनार, वैशाली निकम, रवींद्र निकम, चंद्रशेखर चव्हाण, सुनिता आहेर, सरोज जाधव उपस्थित होते.

Deola | पिंपळगाव जनता विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

‘आरोग्याची काळजी’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक चंद्रशेखर चव्हाण यांनी ‘आरोग्याची काळजी’ या विषयी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले कि, “खातांना, जेवतांना हात धुण्याची सवय असावी. हात स्वच्छ नसतील तर आपण अनेक आजारांना निमंत्रण देतो. आपल्या हातांना नकळत अनेक विषाणू चिटकलेले असतात. खाताना आपण हात स्वच्छ धुतले नाहीत, तर हेच विषाणू आपल्या शरीरात जातात आणि आपण आजारी पडतो. यावरून असे लक्षात येते की, मानवी जीवनात हात धुणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. वैशाली निकम व सरोज जाधव यांनी विद्यार्थ्यांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी विद्यार्थ्यांकडून हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून घेतले. तसेच शालेय परिसराची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here