Political News | राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांतून नावे गाळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चिखली मतदारसंघात सात नंबरचा ऑनलाईन अर्ज करून मतदारांची नावे कमी केली जात आहेत. हा सगळा प्रकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने सुरू आहे. असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज शिवालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अनिल देसाई, आमदार जितेंद्र आव्हाड, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे उपस्थित होते.
“पराभवाच्या भीतीने भाजपचा रडीचा डाव”
यावेळी त्यांनी “विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या भीतीने भाजपचा हा रडीचा डाव सुरू असून भाजप आणि त्यांच्या सोबत असलेल्या पक्षांना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही. दम असेल तर समोरासमोर येऊन लढा.” असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. त्याचबरोबर, “पराभवाच्या भीतीमुळे सरकार मतदार यादीत घोळ घालण्याचे काम करत असून भाजपकडून मतदार यादीतून अनेक नावे व वगळण्याचे आदेश दिले आहेत. जाणीवपूर्वक हि नावे वगळली जात आहेत. सात नंबरचा ऑनलाइन अर्ज कोण भरत आहे? याची माहिती निवडणूक आयोगाकडे नाही. तेव्हा निवडणूक आयोगाने यामध्ये तातडीने लक्ष घालावे, त्याचबरोबर महायुतीचा प्रचार करण्यासाठी राज्याच्या तिजोरीची उधळपट्टी सुरू आहे. योजनांच्या माध्यमातून राज्याच्या तिजोरीला लुटणाऱ्यांचा पर्दाफाश करावा. राज्याच्या तिजोरीला वाचवण्याची गरज आहे.” असे यावेळी त्यांनी सांगितले.
Political News | समाजवादी पार्टीचे पक्षप्रमुख खा. अखिलेश यादव उद्या मालेगावच्या दौऱ्यावर
मतदार यादीत नावे तपासून घेण्याचे आवाहन
यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी “निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम करत आहे. एका गावातील 5000 मतदारांची नावे वगळली आहेत. निवडणूक प्रक्रियेत स्पर्धा, पारदर्शकपणा उरलेला नाही. मतदार यादींची प्रिंटिंग स्पष्ट दिसत आहे. एका घरातील 5 माणसे वेगवेगळ्या मतदान केंद्रावर मतदान करायला जाणार आहेत. 7 नंबरचा ऑनलाइन अर्ज कोण भरत आहे. हेच कळत नाहीये?” असं म्हणत सरकारवर आरोप केले आहेत. तसेच, विजय वडेट्टीवार यांनी “महाविकास आघाडीच्या उमेदवाराला ज्या ठिकाणी अधिक मते मिळाली, तिथे हा प्रयोग करण्यात येत असून मते कमी करण्याचा म”युतीचा प्लॅन आहे. असे म्हणत आरोप केला. तसेच “मतदार यादीत प्रचंड गोंधळ आहे. मतदार यादीतील नावही वाचता येत नाहीयेत तरी मतदारांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही याची खातरजमा करावी.” असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम