Cabinet Meeting | विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असून राज्यामध्ये कधीही आचारसंहिता लागू होऊ शकते याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निर्णयांचा सपाटा लावला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज 19 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. उद्यापासून आचारसंहिता लागू होण्याच्या शक्यतेमुळे शिंदे सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळ बैठक पार पडली.
NDA Cabinet Ministers List | मंत्रिपदासाठी ‘या’ खासदारांना फोन; राज्यात कोणाची रिंग वाजली..?
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय पुढीलप्रमाणे:
* आज रात्री 12 पासून मुंबईतील पाच प्रवेश मार्गांवरील हलक्या वाहनांसाठी टोल माफी (सार्वजनिक बांधकाम)
* सामाजिक न्याय अंतर्गत आगरी समाजासाठी महामंडळ
* उच्च व तंत्रशिक्षण अंतर्गत समाजकार्य महाविद्यालयांच्या अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्कीम
* जलसंपदा अंतर्गत दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजना, आष्टी उपसा सिंचन योजनेसह वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता
* महसुल अंतर्गत राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित, पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी तसेच खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य देणार
* राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार तसेच नगर विकास अंतर्गत पुणे मेट्रो रेल टप्पा दोन मधील रेल्वे मार्गीकांच्या कामांना मान्यता
* किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ करणार तसेच अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे सभेत कर्ज माफ
* महाविद्यालया इमर्जन्सी मेडिसिन ची तीन पदे देणार तसेच खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सुरू करणार
* मराठी भाषेच्या जनजागृतीसाठी पंधरवडा, अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळासाठी अभ्यास गट तसेच उमेदसाठी अभ्यासगट त्याचबरोबर कौशल्य विद्यापीठाला रतन टाटा यांचे नाव देणार
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम