Vardha News | वर्ध्यात वीज अंगावर कोसळून महिला जागीच ठार; तीन जण गंभीर जखमी

0
39
#image_title

Vardha News | आज दुपारी चार वाजताच्या सुमारास वर्धा येथील जुवाडी शिवारात शेतात काम करत असताना अंगावर वीज कोसळल्याने शेतकरी महिला जागीच ठार झाली असून तर इतर तीन शेतमजूर महिला गंभीर जखमी झाल्या आहेत तर इतर दोन किरकोळ जखमी झाल्या.

Vardha | वर्ध्याच्या सभास्थळी गर्दीच नाही; म्हणून भुजबळांची तब्येत बिघडली?

मुसळधार पावसात शेतात काम करत असताना घडली घटना

जुवाडी येथे वास्तव्यास असणाऱ्या मंदा प्रभाकर वाघमारे या महिलेचा मृत्यू झाला असून जखमींना सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. जुवाडी येथील शेतकरी प्रभाकर वाघमारे यांनी पत्नी मंदा यांच्यासह पाच शेतमजूर महिला सकाळी कामासाठी शेतात गेल्या असता दुपारी चार वाजताच्या दरम्यान अचानक जुवाडी परिसरातील शिवारात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यावेळी कामात व्यस्त असताना अचानक कडकडणारी वीज शेतात कोसळली.

बेमोसमी पावसाने घेतला महिलेचा बळी ; वीज पडून महिला ठार

ग्रामस्थांनी तात्काळ रुग्णालयात केले दाखल

यामध्ये मंदा प्रभाकर वाघमारे जागीच ठार झाले असून अर्चना तुकाराम दाभेकर, किरण लती वाल्हे आणि उर्मिला दिलीप कोल्हे यांना विजेचा जबर धक्का बसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. या दरम्यान दोन महिला मजुरांना देखील किरकोळ दुखापत झाली असून घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना त्वरित सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here