Political News | ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांना अंतरवाली सराटीमध्ये जात असताना पोलिसांनी वडीगोद्री येथे थांबवले, त्यावेळी “मनोज जरांगे यांचे लाड जातीयवादी मुख्यमंत्री शिंदे करतायत. माझा प्रशासनावर रोष नसून, प्रशासनावर दबाव असल्यामुळे मला थांबविण्यात आले.” अशी संतप्त प्रतिक्रिया ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली. मनोज जरांगेंनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. त्यानंतर, आता ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी देखील अंतरवाली सराटीत जाऊन बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.
नेमकं काय घडलं
जालना पोलिसांनी वडीगोद्री येथे तगडा बंदोबस्त तैनात केला होता. ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांना आंतरवाली सराटीकडे जात असताना वडीगोद्री येथे पोलिसांनी रोखले. तसेच गोंदी पोलिसांनी आंदोलक वाघमारे यांना भारतीय न्याय संहितेच्या कलम 168 नुसार नोटीस देखील बजावली आहे. त्यानंतर त्यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्र्यांवर केली सडकून टीका
अंतरवाली सराटीमध्ये जाण्यापासून रोखल्यामुळे नवनाथ वाघमारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती सडकून टीका केली असून “जरांगे यांनी उपोषणाची काही परवानगी घेतली नाही. मी परवानगी मागितली आहे. तशी माझ्याकडे पावती देखील आहे. “मुख्यमंत्री एका समाजाचे लाड करतायत. असा जातीयवादी मुख्यमंत्री कधी झाला नाही.” मुख्यमंत्र्याला रातोरात काहीतरी निर्णय द्यायचे असतील.” या शब्दात नवनाथ वाघमारे मी मुख्यमंत्र्यांवरती आरोप करत निशाणा साधला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम