Nana Patole | शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींबद्दल केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळात नव्यावादाची ठिणगी पेटली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी “राहुल गांधी यांची जीभ कापणाऱ्याला अकरा लाखांचं बक्षीस देणार” असे विस्फोटक विधान केले. याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आता संताप व्यक्त केला आहे.
काय म्हणाले नाना पटोले?
ज्याला लोकप्रतिनिधी म्हणून वागवायची अक्कल नाही त्याने राहुल गांधींवरती बोलू नये. शिंदेजी वाचाळवीर संजय गायकवाडांना आवरा अंथरून पाहून पाय पसरावे म्हणतात तसे गायकवाडने आधी आपली पातळी पहावी. प्रसिद्धीसाठी भरणाऱ्या संजय गायकवाड वरती पुन्हा दाखल झालाच पाहिजे. सरकारची ही गुंडशाही, हुकूमशाही जनता पाहत आहे. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांना इशारा दिला.
मोदी-शहांवरही साधला निशाणा
“भाजप नेता राहुल गांधींचा उल्लेख दहशतवादी म्हणून करतो. पक्षाचा झेंडा हाती घेऊन देशाच्या विरोधी पक्ष नेत्याला जो मारण्याची धमकी देतो त्यावर नरेंद्र मोदी,अमित शहा मूक गिळून गप्प बसतात.” अशी टीका करत मोदी-शहांवर टीका केली.
Nana patole : सत्तेसाठी भुकेल्या भाजपने राज्यात तोडफोडीचे महाभारत चालवलं आहे.
कायदा सुव्यवस्था कोठे आहे? शिंदे-फडणवीस यांना सवाल
“शिंदे गटाचा नेता देशाच्या विरोधी पक्ष नेत्याची जीभ कापून टाकण्याची भाषा करतो. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडलीच पाहिजे. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही? लोकशाहीत मानता की नाही? असा सवाल यावेळी पटोलेंनी शिंदे फडणवीस यांना विचारला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम