सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | ई-पीक पाहणी नोंदवण्यासाठी १५ सप्टेंबर ही अंतिम मुदत असून या डिजीटल क्रॉप सर्वेक्षण महोत्सवात तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा व तात्काळ मोबाईल द्वारे इ पीक पहाणीची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार डॉ मिलिंद कुलकर्णी यांनी केले आहे. शासनाने ई-पीक पाहणी नोंदवण्यासाठी अंतिम मुदत 15 सप्टेंबर पर्यंत दिली आहे. परंतु या मुदतीपर्यंतची वाट न पाहता लागलीच पीक पाहणी करून घ्यावी. ई- पीक पाहणी विहीत मुदतीत न नोंदविल्यास शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.
Deola | कणकापूर ग्रामपंचायतीला भुजल समृद्ध ग्राम स्पर्धेत वीस लाखाचे पारितोषिक
यात चालु (2024-25) वर्षाचा 7/12 निघणार नाही, कर्ज प्रकरण करता येणार नाही, पीक विमा मिळणार नाही, 7/12 क्षेत्र पडीक दिसेल, 7/12 निगडीत योजनांचा लाभ घेता येणार नाही, खरेदी विक्रीसाठी अडचण येईल, अनुदानासाठी अडचण येईल, भविष्यात नुकसान झाल्यास पिकांच्या नुकसानीचे ई-पंचनामे होणार नाहीत. याचा विचार करून तात्काळ ई पीक पाहणी करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी, तलाठी, कृषीसहायक, कोतवाल, पोलीस पाटील, सेतु संचालक, स्वस्थ धान्य दुकानदार, यांची मदत घेवुन त्वरित ई-पीक पाहणी मोबाइलद्वारे नोंदवून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम