Police Bharati News | नाशिक जिल्हा पोलिस भरतीत मराठा उमेदवारांच्या निवडीला स्थगिती

0
80
Fake Police
Fake Police

Police Bharati News : नाशिक :    पोलीस भरतीबाबत (Police Bharati) एक मोठी अपडेट समोर आली असून, यानुसार पोलीस भरतीसाठी आर्थिक दुर्बल घटक म्हणजेच EWS प्रवर्गातून अर्ज केलेल्या मराठा समाजाच्या तरुणांची चिंता वाढणार आहे. आर्थिक दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांच्या निवडीला स्थगिती देण्यात आली असून, EWS वगळता इतर उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू असणार आहे, असे आदेश अप्पर पोलीस महासंचालकांकडून देण्यात आले आहेत. (Nashik Police Recruitment)

मागील दोन महिन्यांपासून राज्यात महाराष्ट्र पोलीस दलातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदासाठीची (Police Bharati) अनेक जिल्ह्यांमध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे. यानुसार नाशिक जिल्ह्यातही शहर व ग्रामीण पोलीस दलात शिपाई पदासाठीची पोलिस भरती प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आहे. या अंतर्गत मैदानी चाचणी होऊन, लेखी परीक्षा पार पडली असून, अंतिम निवड यादीही जाहीर झाली आहे.

Police Recruitment 2023: पोलिस भरतीसाठी करताय तयारी ? ; 1746 पदांसाठी होतेय भरती

Police Bharati News | नेमकं प्रकरण काय..?

मात्र, मराठा आरक्षणाबाबतचा गोंधळ कायम असल्याने या पोलीस भरतीसाठी मराठा समाजाच्या ज्या उमेदवारांनी EWS प्रवर्गातून भरतीसाठी अर्ज केला आहे. त्यांच्या निवडीला अप्पर महासंचालकांनी स्थगिती दिली आहे. याबाबत धोरण निश्चितीसाठी अप्पर महासंचालकांनी शासनाला विनंती केली असून, आता शासन निर्णय जाहीर होत नाही तोपर्यंत EWS प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी थेट रद्द करण्याऐवजी त्याला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत अप्पर पोलीस महासंचालकांनी संबंधित विभागांना पत्र लिहिले असून, या पत्रात मराठा आरक्षणाचा गोंधळ कायम असल्याने हा निर्णय घेत असल्याचे स्पष्ट केले आहे. अप्पर पोलीस महासंचालकांच्या या निर्णयामुळे नाशिक शहर व ग्रामीण पोलीस दलात होत असलेल्या भरतीसाठी आर्थिक दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांच्या निवडी प्रलरमबीत ठेवण्यात आल्या आहेत. (Nashik Police Recruitment)

७ हजार पदांसाठी होणाऱ्या पोलिस भरतीची तारीख जाहीर ; जाणून घ्या सर्व माहिती

यापूर्वी अप्पर महासंचालक कार्यालयाने EWS प्रवर्गातील उमेदवारांना SEBC किंवा खुल्या प्रवर्गाची निवड करण्यास सांगितले होते. मात्र, नाशिक जिल्हयातील तात्पुरत्या निवड यादीतील EWS प्रवर्गातून अर्ज केलेल्या 6 पैकी 4 उमेदवारांनी हमीपत्र देण्यासाठी नकार दिल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, यासंदर्भात आता अप्पर महासंचालकांच्या नव्या आदेशानुसार या उमेदवारांची भरती रद्द न करता, तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. यामुळे आता मराठा समाजातील उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. मात्र, याबाबत राज्य शासन काय निर्णय घेणार..? आणि मराठा उमेदवारांच्या भरतीबाबत प्रशासन काय भूमिका घेणार..? याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. (Nashik Police Recruitment)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here