Deola | राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील आहेर यांच्या हाती ‘तुतारी’

0
119
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  देवळा येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील आहेर यांनी मध्यंतरीच्या तटस्थ भूमिकेनंतर आज मंगळवार (दि.२३) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करत तुतारी हाती घेतली. शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा काल नाशिक येथे निष्ठावंत मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यातच सुनील आहेर यांनी पक्षप्रवेश केला. हा प्रवेश करत आहेर यांनी राजकीय जीवनात पुन्हा सक्रीय होण्याचे संकेत दिले. यामुळे कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करत आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या भूमिकेशी ठाम राहण्याचा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.(Deola)

Jayant Patil Nashik | शरद पवारांनंतर जयंत पाटील नाशकात; जयंत पाटलांचा आजचा दौरा का महत्त्वाचा..?

निष्ठावंतांना पक्षात प्रवेश देण्याच्या उद्देशाने झालेल्या या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, खासदार भास्कर भगरे, महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे, प्रदेश युवक अध्यक्ष मेहबुब शेख, प्रदेश युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, जिल्हाध्यक्ष श्याम हिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या प्रवेशानंतर लवकरच या पक्षाच्या युवकांच्या संघटणात्मक पदावर आहेर यांची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

“कार्यकर्त्यांच्या मनातील भावना जाणून घेतल्यानंतर तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसच्या ध्येय धोरणांशीच आपण बांधील राहूअशी भूमिका स्वीकारत शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. यामुळे तालुक्याच्या विकासाला चालना देणे हाच उद्देश आहे.” – सुनील आहेर 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here