इगतपुरी : इगतपुरी तालुक्यातील बांबळेवाडी येथे कामगार मंडळाकडून इयत्ता १० वी व १२ वी गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्त कर्मचारी सत्कार सोहळा व अंगणवाडी प्राथमिक शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती तळपाडे, कृषी संचालक श्रद्धा भवारी, सहाय्यक कक्ष अधिकारी सोमनाथ ठोकळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अर्जुन थेरे, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार राम शिंदे हे उपस्थित होते.
गुरूपौर्णिमेचे औचित्य साधत बांबळेवाडी येथील कामगार मंडळाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. इयता दहावी व बारावी तील गुणवंत विद्यार्थी व बांबळेवाडीतील वीज वितरण, रेल्वे, शिक्षक, एसटी महामंडळ अशा विविध क्षेत्रातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर बांबळेवाडीतील विठ्ठल मंदिरासाठी मोलाचे सहकार्य करणारे ग्रामस्थ यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अंगणवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रमुख मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी मार्गदर्शन केले. तर विद्यार्थ्यांना ‘स्पीक वेल’ या पुस्तकांचे वाटप करत रेल्वे कर्मचारी यशवंत मेमाणे यांनी मनोगत व्यक्त केले. बांबळेवाडी ग्रामस्थांचे आभार मानत भविष्यात चांगला पोलीस अधिकारी बनण्यासाठी विद्यार्थ्यांना जे काही मार्गदर्शन सहकार्य लागेल. ते मी आपला भूमिपुत्र म्हणून निस्वार्थ भावनेने विद्यार्थ्यांना देण्यासाठी तयार असेल. चांगला अभ्यास करून मेहनत घेऊन आपला ध्येय साकार करा, असे सूतोवाच पीएसआय अर्जुन थेरे यांनी केले. तर आपला ग्रामीण भागातील विद्यार्थी चांगला घडला पाहिजे त्याचे करिअर घडले पाहिजे यासाठी मी पाहिजे ती मदत करायला तयार असल्याचे एएसओ सोमनाथ ठोकळ म्हणाले.
Igatpuri | माणिकखांब येथील प्रति पंढरपूरात आषाढी एकादशीला भरणार भक्तीचा मेळा
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या इच्छा आकांक्षा स्वप्न यांना बळ देण्यासाठी एक नवी ऊर्जा आत्मविश्वास देण्यासाठी कामगार मंडळाने दरवर्षी प्रमाणे यावर्षी जो काही उपक्रम हाती घेतला व या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आम्हांला स्थान दिले त्याबद्दल आभार मानत भविष्यातील एक चांगले सनदी अधिकारी, पोलीस, वकील, डॉक्टर, शिक्षक, यासह प्रत्येक क्षेत्रात कार्यरत होण्यासाठी चांगला अभ्यास महत्वाचा असून प्रत्येकाने कामगार मंडळाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन अनाठायी होणारा खर्च टाळत ग्रामीण भागातील आदिवासी गोरगरीब विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. तरच एकविसाव्या शतकात लोकसंख्येत अग्रगण्य असलेल्या देशातील विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात प्रथम स्थानी येईल, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी केले.
त्यानंतर अध्यक्षीय भाषणात बांबळेवाडी म्हणजे आदिवासी भागातील हिऱ्यांची खान आहे. आजपर्यंत या बांबळेवाडीने प्रत्येक क्षेत्रात गगनचुंबी भरारी घेणाऱ्या रत्नांना जन्म दिला आहे. प्रथम माझ्या लहानपणापासून ते आजपर्यंतच्या जीवनातील प्रत्येक गुरूला दंडवत प्रणाम, आज याठिकाणचा प्रत्येक प्रत्येक क्षेत्रात चांगली उल्लेखनीय कामगिरी बजावतोय. बांबळेवाडीसारखे कामगार मंडळ प्रत्येक गावागावात झाले पाहिजे व पुढे आले पाहिजे. बोधकथा गोष्टी सांगत विद्यार्थ्यांचे मने जिंकत स्वतःचा खडतर जीवनप्रवास व्यक्त करत निवृत्ती तळपाडे मामा यांनी अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल बांबळे यांनी केले. तर आभार मोहन मेमाणे व कामगार मंडळाने सर्वांचे आभार मानले.
Igatpuri | टाकेद गट शिष्टमंडळाने घेतली आमदार कोकाटे यांची भेट; विविध विकासकांमांचा घेतला आढावा
या कार्यक्रमाला बांबळेवाडीतील कामगार मंडळाचे अध्यक्ष मारुती भवारी, उपाध्यक्ष भीमा मेमाणे, सचिव पोपट भांगे, खजिनदार पोपट धादवड, सह खजिनदार विठ्ठल बांबळे, सदस्य दत्तू भवारी, लक्ष्मण भवारी, ज्ञानेश्वर मेमाणे,भीमराव बांबळे, किसन भांगे, मोहन मेमाणे, बाबू धादवड, दत्तात्रय धादवड, गणपत बांबळे, नागनाथ ठोकळ, यशवंत मेमाणे, आदींसह उद्योजक नंदू जाधव, निवृत्ती बांबळे, शिवा बांबळे, नारायण भवारी, नामदेव मेमाणे, रघुनाथ मेमाणे, काशिनाथ बांबळे, नरहरी बांबळे, अंगणवाडी सेविका आशा भालेराव, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक जगण साबळे, रवी भवारी आदिसह बहुसंख्य ग्रामस्थ यावेळी उपस्थित हाते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम