सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | तालुक्यातील भऊर येथे विवाह सोहळ्यासाठी बहिणीकडे आलेल्या भूषण पिराजी वाघ (वय २५ ) राहणार मुलूखवाडी (ता.देवळा) याच्यावर सोमवार (दि .१५) रोजी बिबट्याने हल्ला केला. यावेळी त्याने जोरजोरात आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून काढता पाय घेतला. यामुळे जखमी झालेल्या भूषण वाघ याला कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दकाहल करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, भूषण पिराजी वाघ (रा. मुलूखवाडी ता. देवळा) हा त्याच्या भाचीच्या लग्नासाठी भऊर येथे आला होता. सोमवार (दि.१५) रोजी सकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या दरम्यान तो सार्वजनिक शौचालयात गेला असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. त्याने आरडाओरडा केल्याने बिबट्या झाडावर चढून गेला. नंतर शेजारच्या आदिवासी वस्तीतील काही ग्रामस्थ व युवकांनी बिबट्याला हुसकावून लावले.
Deola | वाखारी येथील सर्वसामान्य कुटुंबातील सुजय गुंजाळ झाला सीए
जखमी झालेल्या भूषणवर उपजिल्हा रुग्णालय कळवण येथे उपचार सुरू आहेत. यावेळी माजी सरपंच दादा मोरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुभाष पवार, नितीन पवार, सुरेश माळी, बाळा माळी, भूषण मोरे, पिंटू पिंपळसे, मोहन माळी, बाळू माळी, साहेबराव माळी, पुंडलिक मोरे, अतुल मोरे, धनाजी शिंदे आदी ग्रामस्थांनी बिबट्याला हुसकावण्यासाठी व जखमी युवकाच्या उपचारासाठी धावपळ केली. घटनास्थळी तालुक्याचे वन अधिकारी कौतिक ढोमसे, वनपाल प्रसाद पाटील, सुवर्णा ईकडे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला तसेच जखमीची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. गिरणा नदीकाठी बिबट्याचे वास्तव्य वाढल्याने त्वरित पिंजरा लावत बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम