सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | ‘अपयश ही यशाची पहिली पायरी असून, ते आल्याशिवाय यशाचे महत्त्व कळत नाही’. अपयशातून व्यक्तीला नवी उमेद मिळते. त्यातून तो यशाचे शिखर सर करण्यासाठी जिद्द, मेहनत, प्रयत्नाची पराकाष्ठा करतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जीवनात अपयश आले, म्हणून खचून जाऊ नये. अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन वाखारी (ता.देवळा) येथील सीए उत्तीर्ण सुजय गुंजाळ यांनी केले.
Deola | प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सटवाईवाडी येथील ज्ञानेश्वर मेधने झाला सी.ए
वाखारी येथील सर्वसामान्य कुटुंबातील सुजय गुंजाळ याने 10 वी नंतरचे पुढील शिक्षण नाशिक येथे घेतले. 2013 पासून त्याने सीए चा अभ्यासक्रम सुरू केला. यात कायम सातत्य ठेवत गुरुवारी (दि. ११) रोजी लागलेल्या अंतिम परीक्षेच्या निकालात त्याला यश आले. सुजयचे सीए होण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचे सर्व श्रेय त्याने आपल्या आई वडिलांना दिले. त्याच्या या यशाबद्दल आमदार डॉ. राहुल आहेर, भाजपचे जिल्हा नेते केदा आहेर, देवळा बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, संचालक शिवाजी पवार, भाऊसाहेब पगार, भाजपचे तालुका अध्यक्ष अतुल पवार, कणकापूर विकास सोसायटीचे चेअरमन नामदेव शिंदे, योगेश गुंजाळ, स्वप्नील चव्हाण आदींनी कौतुक केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम