Bus Accident | पंढरीला निघालेल्या वारकऱ्यांवर काळाचा घाला; बस दरीत कोसळली…!

0
75
Bus Accident
Bus Accident

नवी मुंबई :  सध्या राज्याचे वातावरण हे भक्तिमय झाले असून, पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. टाळ, मृदुंग, भजनाच्या आवाजात अवघा महाराष्ट्र दंगला असून, सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असतानाच दुसरीकडे एक दुःखद बातमी समोर आली आहे. मुंबई-पुणे महामार्गावर पंढरपुरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या बसला भीषण अपघात झाला असून, या अपघातात पाच वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. (Varkari Bus Accident) सोमवारी रात्री एक ट्रॅव्हल बस ही डोंबिवलीहून पंढरपूरला निघाली होती. मुंबई-पुणे महामार्गावर ही बस थेट दरीत कोसळल्याने हा अपघात झाला.  (Bus Accident)

Nashik Hit and Run | चांदवड ‘हीट अँड रन’ प्रकरणी मुख्य संशयित स्वतःहून न्यायालयात

Bus Accident | नेमकं काय घडलं..?

अधिक माहितीनुसार, सोमवारी रात्रीच्या सुमारास डोंबिवलीहून निघालेली ही बस 54 वारकऱ्यांना घेऊन पंढरपूरला निघाली होती. दरम्यान, मंगळवारी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास ही बस मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर असताना बससमोरून एक ट्रॅक्टर जात होता. यावेळी बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस ट्र्रक्टरवर आदळली आणि उलटून थेट महामार्गाला लागून असलेल्या 30 ते 40 फूट खोल दरीत कोसळली.

यामध्ये चार जणांचा जागीच तर, एकाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला असून, आठ वारकरी गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि बस व अपघातग्रस्तांना बाहेर काढण्यात आले. मात्र, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ट्रॅक्टरला बंदी असताना हे वाहन महामार्गावर कसे आले आणि या अपघाताचा सविस्तर तपास पोलिस करत आहेत. (Bus Accident)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here