Vishalgad | विशाळगड वाद पेटला; गुन्हा दाखल आता संभाजीराजेंना अटक करण्याची मागणी

0
103
Sambhajiraje arrest
Sambhajiraje arrest

कोल्हापूर :  राज्यात विशाळगडावरील (Vishalgad) अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच पेटला असून, संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात हे अतिक्रमण मुक्ती आंदोलन सुरू आहे. 14 जुलै रोजी गडावर आंदोलन करण्यात आले होते आणि या आंदोलनाला हिंसक वळण लागले. या परिसरातील वाहने व घरांची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जात आहेत.

आतापर्यंत 500 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, आंदोलनाचे नेतृत्व करणारे माजी खासदार संभाजीराजेंवरही (Sambhajiraje chhatrpati) गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी विशेष म्हणजे स्वत: खासदार शाहू महाराज छत्रपतींनीही संभाजीराजेंना विरोध दर्शविला आहे. तर, दुसरीकडे मुस्लिम बोर्डिंगने कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून संभाजीराजेंना अटक करण्याची मागणी केली आहे.

Vishalgad | मुस्लिम बोर्डिंगच्या पत्रात काय..?

काही समाजकंटकांनी नियोजनबध्दपणे 14 जुलै रोजी विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात मोर्चे काढले. या मोर्चाना हिंसक वळण दिले आणि गजापूर मुसलमानवाडी येथील मुस्लिम समाजाच्या घरांवर, प्रार्थनास्थळावर दगडफेक करण्यात आली. महिला व लहान मुलांवर  मारहाण व अत्याचार करण्यात आले. या सदर समाजकंटकांचे नेतृत्व करणारे संभाजीराजे, स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी व या दंगलीचे सुत्रधार रविंद्र पडवळ यांच्याकडून नियोजन करून रसद पुरविण्यात आली.

Hemant Godse | छत्रपती सेनेचा गोडसेंना पाठिंबा; पत्रक काढत कारणही सांगितले..?

या भागात जमावबंदी असताना हा मोर्चा कसा निघाला..? यावेळी पोलीसांना मारहाण, पत्रकारांना धमकावणे असे प्रकार घडले. या घटनेमुळे कोल्हापूरात जातीय तणाव निर्माण झाला असून, याला सर्वस्वी जवाबदार हे संभाजीराजे असल्याने त्यांना ताबडतोब अटक करण्यात यावी आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी द मोहम्मद एज्युकेशन सोसायटी व मुस्लीम बोर्डींगकडून करण्यात आली आहे.

गजापूर मुसलमनवाडी येथे पोलीसांनी सुरक्षा पुरवली नाही व केवळ बघ्याची भुमिका घेतली. त्यामुळे पोलीस प्रशासनही जबाबदार असून, पोलीस अधिक्षक कोल्हापूर यांची बदली करण्याची मागणी सर्व मुस्लिम समाज कोल्हापूर यांच्या वतीने या पत्रात केली आहे. तसेच सर्व स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर कडक कलमे लावावी आणि सरकारी कामात अडथळा, पोलीसांवर हल्ला, महिलांचे विनयभंग, जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला, घरफोडी व लुट, प्रार्थनास्थळावर दगडफेक, धार्मिक ग्रंथ पेटवणाऱ्या समाज कंटकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी समाजाची कळकळीची विनंती आहे. अन्यथा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन व विराट मुकमोर्चा काढण्याचा इशाराही समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या या कथित पत्रात असल्याची माहिती समोर आली आहे.

संभाजीराजे छत्रपती लवकरच माेठा निर्णय घेणार

खासदार शाहू महाराजांकडून संभाजीराजेंना विरोध 

विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी झालेला हिंसाचार हा प्रचंड वेदनादायी असून, आम्ही या प्रकाराचा निषेध करतो. याप्रकरणा यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने माजी खासदार संभाजीराजे व मुख्यमंत्र्यांची चर्चा घडवून आणण्याबाबत सूचना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना व पोलिसांना घटनेपूर्वीच केल्या होत्या.

परंतु त्यांनी ते गांभीर्याने घेतलं नाही आणि त्यानंतरच ही संपूर्ण घटना घडली असून, हे जिल्हा प्रशासनाचे अपयश आहे. विशाळगडाच्या प्रशनासंदर्भात माजी खासदार संभाजीराजे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले आणि त्यांनी सुरूवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली. परंतु त्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर याठिकाणी जो काही हिंसाचार झाला. त्याचा आम्ही निषेध करतो आणि या हिंसाचारात ज्या निष्पापांचे नुकसान झाले आहे. त्यांना सरकारने नुकसान भरपाई देण्याची मागणी खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी केली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here