सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | डांग सेवा मंडळ संचलित ठक्कर बाप्पा आश्रमशाळा आंबेगण (ता. दिंडोरी) येथील प्रयोगशाळा परिचर कैलास त्र्यंबक कुवर हे आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. यानिमित्त येथे सेवापूर्ती समारंभ नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डांग सेवा मंडळाच्या अध्यक्षा हेमलता बिडकर होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे लेखापाल पियुष पारेख तसेच संस्थेच्या सर्व आश्रमशाळा व विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा हेमलता बिडकर यांचे सह मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने कैलास कुवर यांचा सपत्नीक सत्कार केला.
Deola | प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सटवाईवाडी येथील ज्ञानेश्वर मेधने झाला सी.ए
आपल्या मनोगतात माध्यमिक शिक्षक भानुदास गोसावी यांनी कवितेच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. तर आश्रमशाळा आंबेगण येथील माध्यमिक मुख्याध्यापक संदीप कुमावत यांनी त्यांच्या कार्याची माहिती सांगितली. प्राचार्य डॉ. विजय बिडकर, प्राचार्य राजेंद्र पाटील, मुख्याध्यापक चंद्रशेखर अहिरराव, रमेश जाधव यांनी कैलास कुवर यांच्या कार्याचा गौरव केला. सेवानिवृत्त कर्मचारी कैलास कुवर यांनी त्यांच्या कार्यकाळात संस्थेच्या सर्व शाळा सुशोभीकरण करण्यात मोलाची भर घातली. तसेच एकलव्य सोसायटीच्या चेअरमन पदाची धुरा त्यांनी काही काळ सांभाळली. आपल्या सेवापूर्ती निमित्ताने त्यांनी आश्रमशाळा आंबेगण येथील सर्व विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजनाची मेजवानी दिली.
Deola | वाखारी येथील सर्वसामान्य कुटुंबातील सुजय गुंजाळ झाला सीए
या कार्यक्रमासाठी आश्रमशाळा सुळे येथील मुख्याध्यापक प्रशांत जाधव, आश्रमशाळा उंबरठाण येथील मुख्याध्यापक धनराज सोनवणे, आश्रमशाळा वारे येथील मुख्याध्यापक महेंद्र शिंदे, आश्रमशाळा शिंदे (दि.) येथील मुख्याध्यापक विवेक राठोड, जनता विद्यालय मुल्हेर येथील मुख्याध्यापक अशोक नंदन, जनता विद्यालय ओतूर येथील मुख्याध्यापक उल्हास रुपवते, जनता विद्यालय बार्हे येथील मुख्याध्यापिका श्रीमती पवार, जनता विद्यालय अभोणा येथील मुख्याध्यापक पी. एस. अहिरे, सुबोध कुवर, शालिनी देवरे, सपना कुवर आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक राजेंद्र अहिरे, संदीप कुमावत, सुधीर जगदाळे, हेमंत भामरे, अपर्णा गणाचार्य, श्री. तुसे सर, तुषार ह्याळीज, प्रशांत थोरात, सौ.सावंत, श्रीमती निकुंभ, श्रीम पवार, श्रीम ठाकरे, भाऊसाहेब पगार, जगदीश केदारे, वसंत डोंगरे, गणेश गवळी, सतिष राऊत, कमलेश सातपुते आदींनी परिश्रम घेतले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम