Deola | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचवा – आ. डॉ. राहुल आहेर

0
62
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा |  महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत. महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. सदर परिस्थिती लक्षात घेऊन, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात जुलै – 2024 च्या पावसाळी आशिवेशनातील पुरवणी मागणीत “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” ह्या योजनेसाठी आर्थिक तरतूद करून योजना सुरु करण्यात आली असून त्या संदर्भातील मार्गदर्शक सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.

Deola | नमो चषकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव – आ. राहुल आहेर

सदर योजने अंतर्गत पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यात दर महा 1500 रुपये आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. राज्यभरात शेवटच्या घटकापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पोहचवण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. चांदवड – देवळा मतदारसंघात देखील “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” ह्या योजनेस शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी शासकीय यंत्रणेमार्फत प्रत्येक गावात प्रसिद्धी करण्यात येऊन पात्र भगिनीस सदर योजना सुरु होण्याबाबत प्रयत्न करावे. तसेच सदर योजनेकामी लागणारे कागदपत्रेदेखील तात्काळ उपलब्ध करून देण्यात याव्या अश्या सूचना आ. डॉ. राहुल दादा आहेर यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी व यंत्रणेला दिल्या आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here