सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | शेतकऱ्यांसाठी कृषी विभागामार्फत विविध प्रकारच्या योजना राबविल्या जात असून ट्रॅक्टर, कृषी, अवजारे आदींसह सोयाबीन सारखे बियाणे सबसिडीवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. दिवसेंदिवस उत्पादन खर्च वाढत असून, रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांचा वापर करावा. भाजीपाला व पिकांवर मारल्या जात असलेल्या कीटक नाशक फवारणीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर देखील परिणाम होत असल्याने नैसर्गिकरित्या शेती उत्पादन घ्यावे, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी सीताराम चौधरी यांनी केले.
माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त देवळा येथे सोमवारी (दि १) रोजी कृषी दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भरत वेदे गटविकास अधिकारी, चंद्रशेखर अकोले कृषी अधिकारी, रुपेश खेडकर शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र मालेगाव, बाजार समितीचे माजी संचालक जगदीश पवार, गुंजाळनगरचे उपसरपंच विनोद आहेर, आहेर ऍग्रोचे संचालक बापू आहेर उपस्थित होते.
Deola | आहेर महाविद्यालयाच्या खेळाडूंची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॉल बॅडमिंटन स्पर्धेत निवड
प्रथमतः प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री स्व वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. श्रीमती नलिनी खैरनार कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती देवळा यांनी आपल्या प्रास्ताविकात स्व. नाईक यांच्या कार्याविषयी माहिती विशद केली. शास्त्रज्ञ रुपेश खेडकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शेतकऱ्यांनी वेळेवर पेरणी केल्यास हमखास उत्पन्न मिळते. मका पिकाकडे शेतकऱ्यांचा जास्त प्रमाणात कल वाढला असून, यामुळे यामुळे ऍन द्रव्याचा साठा कमी होत आहे. तसेच एकच पिकावर अवलंबून न राहता वेगवेगळी पिके घ्यावीत, व शेणखताचा जास्तीत जास्त वापर करावा.
याप्रसंगी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात भरघोस उत्पादन घेणाऱ्या सचिन बोरसे (सावकी), अनिल आहेर (देवळा), धनंजय बोरसे (विठेवाडी), लिलाबाई आहेर (गुंजाळनगर), अमृत ऍग्रो प्रोड्युसर कंपनी (महाल पाटणे), बी.पी परदेशी कृषि सहायक, श्रीमती एम.आर निकम कृषी सहायक, अविनाश देवरे (खर्डे), के.टी ठाकरे मंडळ अधिकारी (खर्डे), जितेंद्र झाल्टे ग्रामविकास अधिकारी, वैशाली पवार (कृषी सहायक), नानाभाऊ वाघ, उषा गांगुर्डे, निवृत्ती देवरे यांचा प्रमाणपत्र व रोपे देत सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन आत्माचे महेश देवरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदीप थैल, कृषी विस्तारअधिकारी आदींसह कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Deola | सुधारित कायद्यांबाबत जनतेला माहिती होण्यासाठी जनजागृती महत्त्वाची – पो. नि. दिपक पाटील
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम