Vidhan Sabha Election | आजपासून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत असून, विधानसभा निवडणुकीपूर्वी (Maharashtra Assembly Session) या अधिवेशनात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. कारण या विद्यमान सरकारच्या किरकीर्दीतील हे शेवटचे अधिवेशन असणार आहे. येत्या ३ ते ४ महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन निर्णायक असणार आहे. (Vidhan Sabha Election)
दरम्यान, राज्य विधिमंडळाच्या आजपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात काही महत्त्वपूर्ण घोषणा होऊ शकतात. तसेच काही महत्त्वाचे निर्णयही घेतले जाऊ शकतात. राज्य सरकारकडून महिलांसाठी एक विशेष योजना राबवली जणीची दाट शक्यता आहे. तसेच मुलींसाठी पदवीपर्यंतचे शिक्षण (degree education) मोफत करण्याबाबतही काही निर्णय होऊ शकतो. यांसारख्या निर्णयांमुळे महिलावर्गाप्रमाणेच लोकसभा निवडणुकीत खचलेल्या महायुतीलाही (Mahayuti) मोठी दिलासा मिळणार आहे. मुलींचे पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करण्याच्या प्रस्तावावर गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार असून, राज्य सरकार खरंच मुलींसाठी पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करणार का..? हे पहावे लागणार आहे.
Vidhansabha Election | शरद पवार गट विधानसभेच्या ‘या’ ६ जागा लढवणार..?
Vidhan Sabha Election | महिलांना मिळणार दरमहा आर्थिक मदत..?
लोकसभा निवडणुकीप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीतही महायुतीला जनतेकडून आहेर मिळू नये, या पार्श्वभूमीवर आता महायुटीने विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच आता आजपासून राज्य विधीमंडळाचे अधिवेशन सुरू होत असून, यात महिला वर्गांसाठी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. (Vidhan Sabha Election)
सरकारकडून महिला मतदारांना भेट मिळणार असून, या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशमधील ‘लाडली बहन’ यासारखी योजणी महाराष्ट्रातही महिलांसाठी सुरू केली जाण्याची शक्यता आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय महिलांसाठी राज्य सरकार एक योजना आणण्याची तयारी करत आहे, अशी माहिती समोर आली होती. दरम्यान, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशमध्ये ही योजना सुरू केली होती. याअंतर्गत सरकारकडून महिलांना 1250 रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते.
याप्रमाणेच महाराष्ट्र सरकारही महिलांसाठी एक योजना आणण्याच्या तयारीत असून, या योजने अंतर्गत राज्यातील महिलांना 1500 रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाऊ शकते. तर, या योजनेचा फायदा महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीत होईल. या दृष्टीने या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.
Vidhansabha Election | महाविकास आघाडीत बिनसलं..?; काँग्रेसचीही स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम