Sunetra Pawar | गेल्या अनेक दिवसांपासून राज्यसभेच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी अजित पवार गटात सुरू असलेला वाद अखेर शमला. काल राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. यात सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची नाराजी ओढावून अखेर अजित पवारांनी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली. आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून, त्यांनी अर्ज दाखल केला. दरम्यान, त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणाचाही अर्ज न आल्याने सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड झाल्यात जमा असून, आता केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे. (Sunetra Pawar)
बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Election) नणंद विरुद्ध भावजय किंबहूना अजित पवार विरुद्ध शरद पवार या लढतीत सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा पराभव केला. यानंतर आता अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना बॅकडोअरने संसदेत पाठवले आहे. सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल करण्यासाठी यावेळी प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, नरहरी झिरवाळ आदी नेते उपस्थित होते. मात्र, यावेळी महायुतीच्या इतर मित्रपक्षांतील कोणतेही नेते उपस्थित नव्हते. (Sunetra Pawar)
Sunetra Pawar | उमेदवारीची मागणी जनतेतून
दरम्यान, आज सुनेत्रा पवार यांनी विधानभवनात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सुनेत्रा पवार यांच्या व्यतिरिक्त या जागेसाठी कोणीही अर्ज दाखल न केल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली असून, याबाबत केवळ निवडणूक आयोगाकडून अधिकृत घोषणा बाकी आहे. तर, यावेळी पक्षाने मला आज अधिकृत उमेदवारी दिली असून, यासाठी मी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार आणि पक्षातील सर्व नेत्यांचे आभार मानते, असे यावेळी सुनेत्रा पवार म्हणाल्या. पक्षाने दिलेल्या या संधीचे मी सोनं करेल. माझ्या लोकसभेच्या उमेदवारीचीही जनतेने मागणी केली होती. तसेच या उमेदवारीचीही जनतेतून मागणी करण्यात आलेळी आहे. पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला. त्यासाठी त्यांचे मी आभार मानते.(Sunetra Pawar)
Sunetra Pawar Rajya Sabha | दादांचं ठरलंय..! पत्नीला खासदार बनवणारच; घेतला ‘हा’ मोठा निर्णय..?
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम