NCP Ajit Pawar | अजित पवारांचा मोर्चा मुस्लीम मतांकडे; मुस्लीम आरक्षणाची शिफारस करणार..?

0
93
NCP Ajit Pawar
NCP Ajit Pawar

NCP Ajit Pawar | लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा झटका बसला. भाजप आणि शिंदे सेनेच्या अपेक्षेपेक्षाही कमी जागा निवडून आल्या असूनही हे दोन्ही पक्ष आपल्या हिंदुत्त्ववादी मतांवर ठाम आहेत. मात्र, लोकसभेत १ जागा निवडून आलेल्या अजित पवार (Ajit Pawar) गटाने (NCP) तडजोडीची भूमिका घेत अल्पसंख्याक मतांकडे लक्ष घातल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक मते (Minority) मिळवण्याकडे अजित पवार गटाचा कल असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, याचसाठी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अल्पसंख्याक विभागाची बैठक प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात तब्बल दोन तास सुरु होती. तर, या बैठकीत अल्पसंख्याक समाजांचा गमावलेला विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी काय उपाय राबवता येतील यावर चर्चा झाल्याची माहिती आहे.

तर, या बैठकीत महायुतीकडून मुस्लीम समाजाला दुजाभावाची वागणूक मिळत असून, महायुतीच्या मित्रपक्षांचे नेत्यांकडून सातत्याने मुस्लीम समाजाविषयी आक्षेपार्ह विधानं केली जातात. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अल्पसंख्याक समाजांच्या नेत्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. (NCP Ajit Pawar)

Ajit Pawar MLA | अजितदादा गटात भूकंप..?; १० आमदार परतीच्या वाटेवर

NCP Ajit Pawar | अजित पवारांनी मुस्लीम आरक्षणाचा प्रस्ताव मांडावा

एनडीएमध्ये (NDA) घटक पक्ष असलेल्या टीडीपी पक्षाच्या आंध्रप्रदेश सरकारकडून त्यांच्या राज्यात मुस्लिम समाजास चार टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणात ५ टक्के आरक्षण मिळायला हवे आणि याबाबत उच्च न्यायालयाचा निकाल देखील आहे, अशी मागणी अल्पसंख्याक नेत्यांनी यावेळी केली.(NCP Ajit Pawar)

दरम्यान, या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी राज्य सरकारकडे मुस्लीम आरक्षणाबाबत प्रस्ताव मांडणयाची मागणीही या नेत्यांनी केली. या लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून दुरावलेला मुस्लिम आणि अल्पसंख्याक मतदार पुन्हा एकदा आपल्याकडे वळवण्यासाठी ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची असल्याबाबतही या अल्पसंख्याक समाजाच्या नेत्यांच्या बैठकीत चर्चा झाली.

Ajit Pawar | ईव्हीएमची बटणं कचाकचा दाबा, नाहीतर..; दादांची जीभ घसरली..?

मुस्लिम मतदारांचा फटका; फडणवीस यांनीही मान्य केलं 

या लोकसभा निवडणुकीत हिंदुत्ववादी अजेंडा आणि संविधान बदलाबाबत विरोधकांकडून झालेल्या प्रचाराचा महायुतीला मोठा फटका बसला. यामुळे राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये मुस्लीम मतांचा महाविकास आघाडीला पाठिंबा मिळाल्याने महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाल्याची वस्तुस्थिती असून, मुंबईतील काही मतदारसंघांमध्येही मुस्लीम मतदारांनी मविआच्या उमेदवारांना साथ दिल्याने भाजप आणि शिंदे गटाच्या उमेदवारांना पराभवाची धूळ चाखावी लागली. तर, ही बाब भाजपच्या मंथन बैठकीत स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मान्य केली होती. मुंबईतील मराठी मतदारांनी नाहीतर विशिष्ट समाजाने मतदान केल्यामुळे ठाकरे गटाला एकाच भागातून मोठी आघाडी मिळाल्याचेही यावेळी फडणवीस म्हणाले होते.  (NCP Ajit Pawar)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here